Nitesh Rane | नितेश राणेंची शिवसेनेवर बोचरी टीका, म्हणाले- ‘एखादा पेंग्विन कमी पाळा पण…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील खड्ड्यांवरून (potholes mumbai) काही दिवसांपासून भाजप (BJP), मनसेसह (MNS) अन्य विरोधी पक्ष महापालिकेवर (BMC) टीका करत आहेत. दुसरीकडे महापालिकेकडून खड्डे बुजवण्याचे अनेक दावे केले असले तरी प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. काही मिनिटांच्या प्रवासाला तासाचा अवधी लागत आहे. त्यामुळे भाजप आमदार (Nitesh Rane) नितेश राणे यांनी या खड्ड्यांवरून थेट महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांना पत्र लिहिले आहे. दिवाळीपर्यंत खड्ड्यांबाबत ठोस उपाययोजना केली नाही तर रस्त्यावरून उतरू असा इशारा या पत्रात दिला आहे. एवढेच नाही तर नितेश राणे (Nitesh Rane) यांनी एखादा पेंग्विन (Penguin) कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे.

 

काय म्हंटले आहे नितेश राणेंनी पत्रात…

मुंबईकरांनी गेल्या 30 वर्षापासून महापालिकेची सत्ता शिवसेनेच्या (Shivsena) हाती दिली आहे. परंतु, या विश्वासाची परतफेड आपण कायमच रस्त्यावरच्या खड्ड्यांनी केली. किमान हक्काच्या मूलभूत सुविधा तुम्ही पुरवाव्यात अशी मुंबईकरांची रास्त अपेक्षा होती. मात्र, अनेक मुंबईकरांना या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात (Accident) आपला व आपल्या आप्तांचा जीव गमवावा लागला आहे. आज मुंबईकर वैतागून म्हणतोय ‘एखादा पेंग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा’.

मुंबईतील खड्ड्यांसाठी आजपर्यंत 22 हजार कोटी खर्च करूनही खड्डेमुक्त रस्ते होत नाहीत. सामान्यांनी आपल्या करातून दिलेला पैसा मुंबई पालिकेने खड्ड्यात घातला की कॉन्ट्रॅक्टरच्या (Contractor) घशात? असा सामान्य मुंबईकरांच्या मनातला प्रश्न ज्यावेळी लोकशाही मार्गाने भाजप युवा मोर्चाचे (BJP Youth Front) तरूण विचारायला जातात, रस्त्यावर उतरतात त्यावेळी तेंव्हा आमच्यावर दंडुकशाहीचा गैरवापर करून लाठी हल्ला केला जातो.

 

वास्तविक सत्ताधारी कॉन्ट्रॅक्टरधार्जिणे निर्णय घेत असतील आणि विचालेल्याप्रश्नांची दाद देत नसतील
तर लोकशाही (Commissioner) मार्गाने आयुक्तांना भेटण्याचा पूर्ण अधिकारी आहे.
तरीही आयुक्त युवा मोर्चाच्या सहकाऱ्यांना भेटण्याचे टाळत आहेत. याचा अर्थ सेनेकडून आयुक्तांवर दबाव टाकला जात आहे का?,
निवेदन स्वीकारण्याची आयुक्तांना कसली भिती वाटत आहे.

 

मुंबईकरांसाठी न्याय मागणाऱ्यांवर हल्ला करण्यात जी तत्परता दाखवली तीच तत्परता खड्डे बुजवण्यात दाखवावी.
दिवाळीपूर्वी रस्त्यावरचे खड्डे न बुजवल्यास मी (Nitesh Rane) आणि माझे सहकारी स्वत: रस्त्यावर उतरून मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करू
असा इशारा नितेश राणे (Nitesh Rane) यांनी या पत्रात दिला.

 

Web Title :- Nitesh Rane | bjp nitesh rane letter bmc mayor kishori pednekar about potholes mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे ग्रामीण पोलिसांकडून लोणावळयातील हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दिल्लीच्या 2 मुली आढळल्या; प्रचंड खळबळ

Maharashtra Band | शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी ‘महाविकास’ आघाडीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी व्हावे – आ. वरपुडकर

BJP MLA Sunil Kamble | ‘त्या’ व्हायरल क्लिपची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू; पीडित महिला अधिकाऱ्याचा जबाब नोंदवला