Nitesh Rane | भाजप नेत्याचा खोचक सवाल; म्हणाले – ‘तो ‘माजी’ सरकारी भाचा…Mr India झाला आहे का ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nitesh Rane | राज्यात शिंदे-भाजपा सरकार (Shinde-BJP Government) स्थापन झाले तरी राजकीय आरोप – प्रत्यारोप, टिका – टिप्पणी संपलेली नाही. दररोज नेत्यांच्या वक्तव्यांनी राजकीय वातावरण तापत आहे. काही महिन्यांपूर्वी राणा दाम्पत्याने (Rana Couple) मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठणाचा निर्धार केल्यानंतर आक्रमक झालेले युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई (Yuvasena Secretary Varun Sardesai) हे सत्तांतर नाट्याच्या राजकीय उलथापालथ मध्ये कुठेही न दिसल्याने आता भाजपाचे आमदार (BJP MLA) नितेश राणे (Nitesh Rane) यांनी टिका केली आहे.

 

नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलेल्या ट्विटमध्ये अप्रत्यक्षरित्या वरुण सरदेसाई यांच्यावर टिका केली आहे. ट्विटमध्ये खोचक प्रश्न उपस्थित करताना नितेश राणे यांनी म्हटले आहे की, तो ‘माजी’ सरकारी भाचा… Mr India झाला आहे का ?.

अपक्ष खासदार नवनीत राणा (Independent MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) दाम्पत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचे आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. यानंतर शिवसेनेसह युवासेना रस्त्यावर उतरून आक्रमक झाली होती. यावेळी युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई हेही आघाडीवर होते.

 

राणा दाम्पत्याने हे नियोजित आंदोलन मागे घेतल्यावर वरुण सरदेसाई यांनी बोचर्‍या शब्दांत टीका केली होती. मात्र, त्यानंतर एकनाथ शिंदेचे (Eknath Shinde) शिवसेनेतील ऐतिहासिक बंड, सुरू असलेला राजकीय सत्ता संघर्ष, उद्धव ठाकरेंना द्यावा लागलेला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, यात कुठेही वरुण सरदेसाई दिसले नाहीत. म्हणूनच नितेश राणे यांनी हा खोचक प्रश्न शिवसेनेला विचारला आहे.

 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर नव्या शिंदे-फडणवीस सरकारने बहुमत चाचणी (Majority Test) जिंकली आहे.
आता महाविकास आघाडी, भाजप आणि शिंदे गटाचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) सुनावणीकडे लागले आहे.
मात्र, अजूनही आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत.

 

Web Title :- Nitesh Rane | bjp nitesh rane slams yuva sena secretary varun sardesai after big revolt in shiv sena

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा