Nitesh Rane | दसरा मेळाव्यानंतर नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका, म्हणाले – ‘उद्धवजींमध्ये राहुलजी एकदम स्पष्टपणे दिसतात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nitesh Rane | शिवसेनेचा शुक्रवारी दसरा मेळावा झाला. यावेळी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही आणि आवाज दाबणारा कधी जन्माला येऊ शकत नाही. काही जण माझे भाषण संपायची वाट बघत आहे. ते झालं की, चिरकायला बरं अशी काहींची अवस्था आहे. कारण ठाकरे कुटूंबियांवर टीका केली किंवा चिरकलं की, त्यांना रोजगार मिळतो, असा टोलाही त्यांनी लगावला होता. दरम्यान, मेळाव्यानंतर भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, दसरा मेळाव्यानंतर आता पूर्ण आत्मविश्वासानं सांगू शकतो, आम्हाला उद्धवजींमध्ये राहुलजी एकदम स्पष्टपणे दिसतात. यात कोणतीही शंका नाही, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.

 

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

माझ्या शिवसैनिकांच्या जीवावर कोणी अंगावर आलं, तर शिंगावर घेऊ हे आव्हान मी देत आहे. तुम्हाला जर अंगावर यायचं असेल तर स्वतःच्या जीवावर आव्हान द्या. ईडी, सीबीआयच्या जोरावर आव्हान देऊ नका. आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागे लपून बसायचं हे हिंदुत्व नाही. याला नामर्दपणा म्हणतात. पुढील काही महिन्यात महाविकास आघाडी दोन वर्षे पूर्ण करत आहे. सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न झाले. हिंमत असेल तर पडून दाखवा. सरकार पडत नाही म्हणून छापा-काटा सुरु झालं आहे. कोणावर छापे टाकायचे आणि कोणाचा काटा काढायचा हे सुरु आहे. पण हि थेरं जास्त काळ चालणार नाही. असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.

 

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू आहे. स्वातंत्र्य लढ्यात लाल बाल आणि पाल, महाराष्ट्र, बंगाल, पंजाब पुढे होता.
बंगाली जनतेने धडा शिकवला त्या बंगाली जनतेचं आणि ममता दीदींचे अभिनंदन.
आपल्या रगारगात न झुकण्याची जिद्द कायमी ठेवावी.
दिल्लीच्या तख्ताला हर हर महादेव हे दाखवण्याची वेळ येऊ नये पण आली तर दाखवावीच लागेल,
असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

 

Web Title :- Nitesh Rane | congress leader rahul gandhi cm uddhav thackeray bjp leader nitesh rane slams cm after dussehra melawa

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | बनावट सर्टिफिकेट व अलॉटमेट लेटर देऊन 24 लाखांना गंडा; पुणे पोलिसांकडून दोघांना अटक

Modi Government | नोकरीसोबत सुरू करा ‘हा’ व्यवसाय, 1 लाख रुपयांपर्यंत होईल नफा; मोदी सरकारकडून मिळेल 80% कर्ज

Aurangabad Accident | औरंगाबाद जिल्ह्यात ट्रॅक्टर-दुचाकीच्या भीषण अपघातात बहीण भावासह भाचीचा मृत्यू