home page top 1

चिखलफेक करणाऱ्या नितेश राणेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, वकिलाकडून जामिनासाठी प्रयत्न सुरू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नितेश राणेंना चिखलफेक चांगलीच महागात पडली आहे. नितेश राणेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. यापूर्वी ९ जुलैपर्य़ंत नितेश राणे यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती. राणे यांच्या जामीनावर आज पुन्हा सुनावणी झाली, त्यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यामुळे राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना २३ जुलैपर्यंत तरुंगात राहवे लागणार आहे. राणेंच्या वकिलांकडून नितेश राणेंना जामिन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

नितेश राणे आणि त्यांच्या १८ कार्यकर्त्यांना आज कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी आरोपींना १४ दिवासांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या खड्ड्यांना जबाबदार धरून महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना नितेश राणे यांनी चिखलाची आंघोळ घातली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नितेश राणे यांना गुरुवारी अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंनी याप्रकरणावर युक्तीवाद केल्यानंतर न्यायाधिशांनी नितेश राणे यांना ९ जुलैपर्य़ंत पोलीस कोठडी सुनावली. नितेश राणे आणि त्यांच्या ४० ते ५० समर्थकांवर कलम ३५३, ३४२, ३३२, ३२४, ३२३, १२०(A), १४७, १४३, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे.

दरम्यान, अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी नितेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा कलम लावण्याचे आदेश मी दिले आहेत, असं चंद्रकांत पाटील अभियंत्याच्या कुटुंबाला सांगत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चंद्रकांत पाटलांनी घेतलेल्या भूमिकेवर भाजपच्याच कार्यकर्त्यांनी त्यांना घरचा आहेर दिला आहे. सिंधुदुर्गमधील भाजपने नितेश राणे यांनी केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान

पावसाळ्यात घ्या या ‘५’ पद्धतीने ओठांची काळजी

अधिक प्रमाणात तुपाचे सेवन शरीरासाठी हानिकारक ; जाणून घ्या ‘योग्य मात्रा’

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

 

Loading...
You might also like