Nitesh Rane | गौरी भिडेंच्या जिवाचे रक्षण व्हावे; दिशा सालियान, सुशांत सिंह राजपूत, मनसुख हिरेन… , नितेश राणे यांचे खळबळजनक ट्विट!

0
363
Nitesh Rane | life of gauri bhide shud be protected so maharashtra state gov shud give police protection to her right away nitesh rane
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपा (BJP) नेते आणि  केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांचे पुत्र नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबियांना टार्गेट करत खळबळजनक ट्विट केले आहे. यावेळी नितेश राणे (Nitesh Rane) यांनी गौरी भिडे (Gauri Bhide) यांच्या माध्यमातून ही टीका केली आहे. दादर-मुंबई येथे राहणार्‍या गौरी भिडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Party Chief Uddhav Thackeray) आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात (High Court) दाखल केली आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचलनालय (ED) आणि सीबीआय (CBI)चौकशीचे आदेश देण्याची मागणी भिडे यांनी केली आहे. आज या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

ADV

या प्रकरणाचा संदर्भ देत नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे कुटुंबियांना (Thackeray Family) अडचणीत आणण्यासाठी निशाणा साधला. या ट्विटमुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मुंबई पोलिसांत (Mumbai Police) तक्रार देऊनही कारवाई न झाल्याने याचिका करावी लागली, असा आरोप भिडे यांनी केला आहे. केंद्र सरकार (Central Government), राज्य सरकार (State Government), सीबीआय, ईडीसह उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray), आदित्य (Aditya Thackeray) आणि तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांनाही याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे.

नितेश राणे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, गौरी भिडे हिच्या जिवाचे रक्षण व्हावे, महाराष्ट्र राज्य शासानाने तिला त्वरित पोलीस संरक्षण द्यावे. दिशा सालियान (Disha Salian), सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) आणि मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचे काय झाले ते आम्हाला माहीत आहे. या ट्विटमधून गंभीर अर्थ निघत असल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या याचिकाकर्त्या गौरी भिडे यांनी दावा केला आहे की, गेल्या सात- आठ वर्षांपासून ना खाऊंगा ना खाने दूंगा तसेच और जो आज तक खाया वो भी उगलवा लुंगा या ब्रीदवाक्याने मी खरोखरच प्रेरित आहे.
त्यामुळे या देशाचा एक प्रामाणिक आणि जागरुक नागरिक म्हणून, मी केंद्र सरकारला आणखी काही लपविलेल्या,
उत्पन्नाच्या तुलनेत बेहिशेबी संपत्ती शोधून काढण्यासाठी काही प्रमाणात मदत करण्याचा विचार केला आणि आर्थिक
गैरव्यवहाराच्या माध्यमातून जमवलेले पैसेही उघडकीस आणण्याचे ठरवले आहे.

गौरी भिडे यांनी, ठाकरे कुटुंबाने कशाप्रकारे भ्रष्टाचार केला आणि बेहिशेबी मालमत्ता जमा केली हे सांगणारी कागदपत्रे याचिकेसोबत सादर केली आहेत.
कोणत्याही राजकीय पक्षात स्वत: अधिकृत पद धारण करणे, हे उत्पन्नाचे कायदेशीर स्त्रोत असू शकत नाही.
तसेच, कोणत्याही राज्यात मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रिपदाची घटनात्मक पदे धारण करणे हे देखील उत्पन्नाचे
साधन नाही.

उद्धव, आदित्य आणि रश्मी यांनी कधीही कोणत्याही विशिष्ट सेवा, व्यवसाय त्यांच्या उत्पन्नाचे अधिकृत स्त्रोत उघड केले नाहीत.
तरीही त्यांच्याकडे मुंबईसारख्या शहरात आणि रायगड जिल्ह्यात प्रचंड मालमत्ता आहे, असा आरोप याचिकेत गौरी भिडे यांनी केला आहे.

Web Title :- Nitesh Rane | life of gauri bhide shud be protected so maharashtra state gov shud give police protection to her right away nitesh rane

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा