Nitesh Rane | तालिका अध्यक्षाच्या खुर्चीचा अपमान या सोंगाड्याने केला, नितेश राणेंची भास्कर जाधव यांच्यावर जहरी टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घातलेल्या गोंधळावरुन विरोधी पक्षाचे 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. या निलंबनाच्या कारवाईवरुन भाजप आमदार नितेश राणे (BJP Nitesh Rane) यांनी भास्कर जाधव यांच्यावर प्रहार केला आहे. नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, आम्ही कोकणातले आहोत, भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) कोकणातले आहेत, कोकणात दशावतार असतो. त्यात सोंगाड्या, नरकासूर भूमिका आहे. भास्कर जाधव सोंगाड्या, नरकासूर आहेत, अशी घणाघाती टीका नितेश राणेंनी केली.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

तालिका खुर्चीचा अपमान या सोंगाड्याने केला

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनला सोमवार (दि.5) पासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) ठरावावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. सभागृह स्थगित झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घातलेल्या गोंधळावरुन भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं. यावरुन नितेश राणे म्हणाले, आमचे 12 आमदार सैनिकासारखे लढले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन त्यांचे निलंबन करण्यात आले. तालिका खुर्चीचा अपमान या सोंगाड्याने केला आहे, अशी जहरी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

भास्कर जाधव नरकासूर विश्वास ठेऊ नका

नितेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधताना, या नरकासूरावर विश्वास ठेवायची गरज नाही. मला आश्चर्य वाटतं ते रडले नाहीत, स्वत:चे कपडे फाडले नाहीत. या सरकारकडून कही अपेक्षा नाही, ओबीसी आरक्षणावरुन आमचे सरकारही लढले आहे. कोकणातली माणसं भास्कर जाधव यांना चांगलेच ओळखतात. हा माणूस सोंगाड्या, नरकासूर आहे असं नितेश राणे म्हणाले.

भास्कर जाधव हा ‘संकासुर’

नितेश राणे यांनी ट्विट करुन भास्कर जाधव यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. भास्कर जाधव हा ‘संकासूर’ आहे, असे नितेश राणे म्हणाले. ते पुढे म्हणाले, कोकणाच्या दशावतारात संकासुराने 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणे चोरून समुद्राच्या तळाशी शंकात जाऊन लपला. त्याच प्रमाणे भास्कर जाधव यांनी संविधानाने आमदारांना दिलेले अधिकार चोरून नेले आणि निलंबनाची कारवाई केली अशी टीका राणे यांनी केली.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

Web Title : maharashtra vidhan sabha adhiveshan live bjp nitesh rane target bhaskar jadhav over mla suspension

हे देखील वाचा

Coronavirus | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 13,027 ‘कोरोना’मुक्त, 6,740 नवीन रुग्ण

Pune Crime Branch Police | दरोड्याच्या तयारीत असलेल्या बबन व्यवहारे याच्यासह चौघांना गुन्हे शाखेकडून अटक

12 BJP MLA Suspended | 12 आमदारांच्या निलंबनाने सत्ताधार्‍यांची खुर्ची मजबूत होणार ?
जाणून घ्या

SPPU Pune University | पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षांची तारीख जाहीर,
‘या’ तारखेपासून सुरु होणार परीक्षा