Nitesh Rane | नितेश राणेंना मोठा धक्का ! मुंबई हायकोर्टानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Nitesh Rane | भाजप आमदार नितेश राणेंचा (Nitesh Rane) अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) फेटाळला आहे. नितेश राणेंसोबत अटकपूर्व जामीन अर्ज (Pre-Arrest Bail Application) करणाऱ्या संदेश उर्फ गोट्या सावंत (Sandesh Sawant) यांचीही याचिका फेटाळली आहे. तर, मनिष दळवींचा (Manish Dalvi) अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला असल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.

 

शिवसेनेचे पदाधिकारी संतोष परब (Santosh Parab) यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अखेर हाय कोर्टाने (Mumbai High Court) फेटाळला आहे. कणकवली येथील जिल्हा सत्र न्यायालयाने (District Sessions Court) अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिल्याने नितेश राणेंना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा सहभाग असल्याचे पुरावे आहेत.
त्याचबरोबर ही घटना राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची विधिमंडळ अधिवेशनाच्या वेळी खिल्ली उडवण्या पूर्वी घडलेली आहे.
त्यामुळे राजकीय सूड म्हणून नितेश यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही, असा दावा पोलिसांनी गुरुवारी हाय कोर्टात केला होता.
दरम्यान यानंतर कोर्टाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर नितेश राणे यांच्या याचिकेवर सोमवारी निर्णय देण्याचे स्पष्ट केलं होतं.
त्यानूसार आज सुनावणी घेण्यात आली.

 

दरम्यान आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला तरी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) त्यांना या आदेशाला आव्हान देता यावे तोपर्यंत त्यांना कारवाईपासून अंतरिम संरक्षण देण्याची मागणी त्यांच्या वकिलाने केलीय.
याबाबत 12.30 वाजता सुनावणी होणार आहे.

 

Web Title :  Nitesh Rane | mumbai bombay high court rejected bail plea of bjp nitesh rane in shivsena santosh parab attack case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा