Nitesh Rane | ‘लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणाऱ्यांनी…’, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितेश राणेचा प्रहार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान छत्रपती संभाजी राजे यांच्यावर केलेल्या विधानामुळे अजित पवार चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यावर त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी सत्ताधारी भाजपने केली होती. त्यासंबंधी काल (दि. ४) रोजी अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी याबाबत बोलताना आपल्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचे म्हटले आहे. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या विधानाबाबत भाजप नेते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्वीट करत अजित पवारांवर खोचक शब्दात टीका केली होती. त्यांच्या या ट्वीटबाबत पत्रकार परिषदेत अजित पवारांना सवाल केला असता, त्यांनी आपल्याला याबाबत टिल्लू लोकांनी सांगण्याची गरज नाही म्हणत नितेश राणेंवर टीका केली होती. त्यावर अजित पवारांना नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उत्तर दिले आहे.

नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्वीट करत अजित पवारांवर निशाना साधला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहीले आहे की, ‘लघूशंकेने धरणाची ऊंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले यावरूनच त्यांची वैचारिक ऊंची कळाली व हे सिध्द झाले की यांना ‘औरंग्यावरची’ टीका सहन होत नाही म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही.’

नितेश राणेंबाबत नेमके काय म्हणाले होते अजित पवार?

भाजपकडून अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावर राज्यभर आंदोलन केले जात आहे. त्यावर अजित पवारांनी काल (दि. ४) रोजी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. त्यावेळी त्यांना नितेश राणेंनी (Nitesh Rane) त्यांच्यावर केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला असता, ‘आपल्याला टिल्ल्या लोकांनी सांगण्याची गरज नाही. त्यांची ऊंची किती आणि त्यांची झेप किती, त्यांना मी कशाला उत्तर देऊ? त्यांना उत्तर आमचे इतर प्रवक्ते देतील’ असं यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले होते.

नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर एक ट्वीट करत
टीका केली होती. त्यावर त्यांनी लिहिले होते, “आपण औरंगजेबाबाबत ‘औरंगजेब क्रूर असता तर विष्णूचं मंदीरही
तोडल असत ना?’ असं केलेलं वक्तव्य स्वाभाविकच आहे.
कारण आपले सर्वस्व यांची श्रध्दा औरंगजेबावर आहे, हे केव्हाच सिध्द झालं आहे! कारण त्यांनी तहआयुष्यात
कधीही आमच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक केलं
नाही किंवा रायगडाच्या दिशेने त्यांचे कधी पाय वळाले नाही.” असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे.

Web Title :- Nitesh Rane | nitesh rane replied to ajit pawar criticism on hight

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांचा मध्य प्रदेशातील चंदनाच्या कारखान्यांवर छापा; 15 लाखांचे चंदनाचे तेल व लाकुड हस्तगत, राज्यात प्रथमच चंदन तस्करीच्या मुळापर्यंत पोहचले पोलीस

Tara Sutaria | आदरशी खरंच ब्रेकअप झालं का? या प्रश्नावर तारा सुतारियाने दिली प्रतिक्रिया