Nitesh Rane | नितेश राणेंचा संभाजीराजे छत्रपतींना सवाल; म्हणाले – ‘औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देणाऱ्यांसोबत जायचं की नाही ते ठरवा’

कुडाळ : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यसभा निवडणुकीवरुन (Rajya Sabha Election) राज्यात आता राजकीय आखाडा तापला आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांना राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पाठिंबा दिला आहे. तर शिवसेनेचा (Shivsena) पाठिंबा मिळावा यासाठी संभाजीराजे छत्रपती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना भेटण्यासाठी वर्षा निवासस्थानी गेले आहेत. त्यावर नितेश राणे (Nitesh Rane) यांनी टीका केली आहे. ज्यांनी औरंगजेबाच्या कबरीला (Aurangzeb Tomb) संरक्षण दिले. त्यांच्यासोबत जायचं की नाही ते संभाजीराजेंनी ठरवावं, असा टोला नितेश राणे (Nitesh Rane) यांनी लगावला आहे.

 

औरंगजेबाच्या कबरीवरुन वाद सुरु झालेला असताना राज्य सरकारने (State Government) पाच दिवसांसाठी औरंगजेबाच्या कबरीवर येण्यास पर्यटकांना (Tourist) मनाई केली आहे. यावरुन नितेश राणे यांनी सवाल उपस्थित केला आहे. औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणाऱ्या लोकांना आपण दोन पायावर जाऊ देतो हीच आपली शोकांतिका आहे. संभाजी महाराजांना (Sambhaji Maharaj) ज्यांनी तडफडून मारले त्यांची कबर महाराष्ट्रात कशाला हवी? पुरातत्व खातं (Archeology Department) विजयदुर्ग किल्ल्याच्या (Vijaydurg Fort) डागडुजीला प्रतिसाद देत नाही. मात्र, औरंगजेबाची कबर येथे काही घडू नये म्हणून पाच दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवतात. कशी माणसे या खात्यात आहेत बघा, अशा शब्दात नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संताप व्यक्त केला. तसेच कबरीवर पर्यटकांना येण्यास मज्जाव करण्याऐवजी कबर ठेवताच कशाला? असा सवाल त्यांनी केला आहे.

आता आपली लढाई आर्थिक उन्नतीसाठी
मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) भाष्य करताना नितेश राणे म्हणाले, मराठा समाज संघटीत होत नाही ही तक्रार आहे.
त्यावेळचा काळ वेगळा होता. अन्यायाविरुद्ध लढायचं असेल तर त्यावेळी तलवार उचलावी लागत होती.
आपली आता लढाई आर्थिक उन्नतीसाठी आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यात फिरलो.
आज अण्णासाहेब महामंडळाची (Annasaheb Mahamandal) काय स्थिती आहे? सारथीला निधी उत्पन्न करुन द्या म्हणून वारंवार मागणी करतोय, असे राणे म्हणाले.
संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) इतिहास सांगणाऱ्यांपैकी आम्ही आहोत.
दुसरा कुठला समाज आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

 

Web Title :- Nitesh Rane | nitesh rane slams sambhaji chhatrapati over meeting with cm uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

LIC IPO | एलआयसीचे काय होणार? 841 रूपये झाला शेअरचा भाव; जाणून घ्या शेअर मार्केटमधील हलचाल

 

Dolly Khanna Stock | दोन वर्षात डॉली खन्ना यांच्या शेअरने दिला 600% रिटर्न, अजूनही आहे का गुंतवणुकीची संधी?

 

Anti Corruption Bureau (ACB) Thane | भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर अँटी करप्शनकडून गुन्हा दाखल