Nitesh Rane | ‘शिवसेनेत आल्यावर प्रत्येकजण वाघ होत नाही, आजूबाजूला मांजरी पण असतात’ – नितेश राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर काही गंभीर आरोप केले होते. त्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेत्यांनी राऊतांवर निशाणा साधताना दिसत आहेत. याआधी भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही राऊतांचा पत्रकार परिषदेतील घाम पुसतानाचा व्हिडीओ ट्विट केला होता. यावर नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

घाबरलेला माणूस कसा दिसतो. घाम पुसत असताना महाराष्ट्राला दिसलं पाहिजे, शिवसेनेत (Shivsena) असल्यानंतर प्रत्येकजण वाघ होत नाही.
आजूबाजूला मांजरी पण असतात, असं नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले.
नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर (Sindhudurg District Bank) तज्ज्ञ संचालक म्हणून बिननिरोध निवड झाली आहे.
यावेळी बोलताना राणेंनी राऊतांवर टीका केली. यावर राऊत काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

जिल्हा बँकेत तज्ज्ञ संचालक म्हणून माझी निवड जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने (Board of Directors) केली.
कायद्यानुसार जो त्या चौकटीत बसतो त्याच व्यक्तीला ती जबाबदारी देऊ शकतात आम्ही त्या चौकटीत बसतो म्हणून पक्षाने ही जबाबदारी दिल्याचं नितेश राणे यांनी सांगितलं.

 

दरम्यान, मुंबई महापालिकेने Brihanmumbai Municipal Corporation (BMC) राणेंना बेकायदेशीर बांधकाम (Illegal Construction) असल्याचं सांगत नोटीस (Notice) पाठवली आहे.
यावर बोलताना, कायदेशीर बाबीला कायदेशीर पद्धतीने उत्तर देणार असल्याचं राणे म्हणाले.
मात्र इतके दिवस राणेंचा बंगला मुंबईत आहे मात्र आता नोटीस पाठवली असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

 

Web Title :- Nitesh Rane | Not everyone becomes a tiger when they join Shiv Sena there are cats around Nitesh Rane

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा