Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nitesh Rane On Sanjay Raut | महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि भाजप (BJP) यांच्यात सातत्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. त्याहूनही शिवसेना (Shivsena) आणि भाजप यांच्यात तर राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळते. अशातच भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena Leader Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे. ‘अयोध्या सोडा. पण संजय राऊत मुंबई-महाराष्ट्रात एकटे तरी फिरले तरी काय अवस्था होईल हे कळेल,’ असा जोरदार निशाणा त्यांनी लगावला आहे.

नितेश राणे म्हणाले, ”संजय राऊत यांच्यासारख्या लोकांना महत्व द्यायचे नाही, असे आम्ही ठरवले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा संजय राऊत यांनी एकटे अयोध्या सोडा, मुंबई-महाराष्ट्र तरी फिरले तरी काय अवस्था होईल हे कळेल. संपूर्ण दिवस शरद पवार यांची आणि अन्य लोकांची हाजी-हाजी करुन परत एकदा खासदार झाले आहेत. राऊत हे नक्की शिवसेनेच्या की राष्ट्रवादीच्या कोट्यातून खासदार झाले आहेत,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

पुढे नितेश राणे म्हणाले, ”केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले. मात्र राज्यातील सत्ताधाऱ्यांना एक टक्का लाज उरली आहे वाटतं, त्यामुळे त्यांनी काहीतरी दिखावा केला आहे. मागील अनेक दिवसांपासून आम्ही राज्य सरकारकडे इंधनावरील कर कमी करण्याची मागणी करत होतो. पण, नंतर आम्हाला समजले आर्थिक बजेटचा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी काहीही संबंध नाही. त्यांना फक्त बॅगा आणणे आणि बॅगा पोहोचवणे एवढेच येते.” अशी टीका त्यांनी केली.

Web Title : Nitesh Rane On Sanjay Raut | bjp nitesh rane taunts shiv sena leader and
mp sanjay raut at kalyan visit

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?’ – भाजप नेते किरीट सोमय्या

Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे; न्यायालयाचे निरीक्षण

 

Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी झुंबड

 

Pune Crime | लाल महालात ‘लावणी’ करणे पडले महागात ! नृत्यांगणा वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर