Nitesh Rane On Sanjay Raut | संजय राऊत सर्वात मोठा लँड माफिया, धमकी देऊन जमीन विकत घेतली; भाजप आमदार नितेश राणेंचा गंभीर आरोप (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nitesh Rane On Sanjay Raut | शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) हा सर्वात मोठा लँड माफिया (Land Mafia) आहे. आज पुन्हा एकदा त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांच्यावर आरोप केला आहे. त्यांना भाषण माफिया म्हटलं आहे. मात्र, संजय राऊत हा सर्वात मोठा लँड माफिया आहे, असा आरोप भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी केला आहे. अलिबागमध्ये किहीम (Kihim Beach) या ठिकाणी असलेली जमीन धमक्या देऊन कमी किंमतीत विकत घेतली. त्यासाठी मराठी कुटुंबाला धमक्या दिल्या, असाही आरोप नितेश राणे (Nitesh Rane On Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत केला.

नितेश राणे पुढे म्हणाले, कैदी नंबर 8959 ची ही इच्छा आहे की मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरेंचे (Aaditya Thackeray) कपडे फाडावेत. कारण तो आरोप करत असेल तर मी उत्तर देत राहणार आहे. संजय राजाराम राऊत हा किती मोठा लँड माफिया आहे हे मी महाराष्ट्राला सांगतो. अलिबागच्या किहीम बीचवर संजय राऊतला जागा पाहिजे होती. त्यामुळे मराठी कुटुंबाकडून कवडीमोल भावात दमदाटी करुन जागा घेतल्याचा आरोप राणे यांनी केला.

पुशिरकर नावाचं ते कुटुंब असून किहीम बिचवर रिसॉर्ट बांधण्यासाठी याचे मनसुबे आहेत.
कोट्यावधींची जमीन अवघ्या दहा कोटींमध्ये घेतली. दुसऱ्यांना माफिया बोलणारा संजय राऊत किती मोठा
लँड माफिया आहे याचं उत्तर महाराष्ट्राला दिलं पाहिज. मुंबईतील भांडुप, विक्रोळी भागात आर वरुन सुरु होणाऱ्या बिल्डरसोबत राऊतांची पार्टनरशिप आहे. किती लोकांच्या जमिनी बळकावल्या? असा सवाल राणेंनी राऊतांना विचारला आहे.

मी बेळगावच्या मराठी जनतेला आवर्जून सांगतो की आरोपी कैदी नंबर 8959 जो तुमच्यासमोर येतो,
मराठी माणसाच्या हितासाठी भाषण करतो त्याची आज कोर्टात हजेरी आहे.
पत्राचाळ प्रकरणात मराठी माणसांची घरं याने लाटली आहेत.
हा जो बोंबलतो की माझ्यावर चुकीचा गुन्हा दाखल केला आहे तो खोटारडा आहे.
मी बेळगावच्या जनतेला सांगेन अशा दरोडेखोराला असल्या चाप्टर माणसाचं तुम्ही ऐकून नका ही माझी विनंती आहे.
चपट्या पायाचा, घरफोड्या माणासाचं ऐकून चुकीच्या लोकांना मत देऊ नका, असे आवाहन नितेश राणे
यांनी बेळगावच्या जनतेला केले.

Web Title :- Nitesh Rane On Sanjay Raut | shivsena ubt mp sanjay raut is big land mafia said bjp mla nitesh rane

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Chandrashekhar Bawankule | निवड चुकली हे शरद पवारांना आता कळलं, उद्धव ठाकरेंबद्दल भाजपनं डिवचलं (व्हिडिओ)

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : फरासखाना पोलिस स्टेशन – बुधवार पेठेत गंमत म्हणून आले अन् तिघांनी त्यांना मारहाण करून लुटले