भाजप आमदार नितेश राणेंचा सवाल, म्हणाले – ‘शिवसेनेच्या अटक झालेल्या नेत्यांची लिंक हिरेन प्रकरणाशी कशी?, वाझेंचा गॉडफादर कलानगरमध्ये आहे काय?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवास्थानाबाहेरील स्फोटक आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Encounter Specialist Pradeep Sharma) हे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA ) रडारवर होते. अखेर शर्मा यांना NIA ने अटक केली आहे. दरम्यान यावरून भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अटक झालेल्या आणि चौकशी होत असलेल्या नेत्यांची नावे मनसुख हिरेन प्रकरणाशी कशी जोडली जात आहेत. 2019 मध्ये प्रदीप शर्मा Pradeep Sharma यांनी शिवसेनेतून (Shiv Sena) विधानसभा लढवली होती. मूळ मुद्दा एवढाच आहे की या सर्व प्रकरणाशी शिवसेनेची लिंक काय आहे? सचिन वाझेंचे गॉडफादर कलानगरला बसले आहेत काय?, असा सवाल राणे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे. (nitesh rane reaction on encounter specialist pradeep sharma arrest)

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

आमदार नितेश राणे ( MLA Nitesh Rane) म्हणाले की, सध्या सर्वच संशयाच्या सुया एकाच दिशेनं जात आहेत. या मागचा मास्टरमाईंड कलानगरला बसला आहे. एनआयएने (NIA) डायरेक्ट कलानगरमधून चौकशी सुरू करावी. कलानगरात मनसुखचे मुख्य आरोपी आहे. तिथेच हेड क्वॉर्टर आहे, असा दावाही त्यांनी केला. अनिल परब हे वाझेंचे बॉस आहेत. ते वाझेंसाठी अधिवेशनात भांडत होते. मुख्यमंत्रीही त्याची बाजू घेत होते. वाझे काय लादेन आहे का? असे मुख्यमंत्री म्हणत होते. या प्रकरणी एनआयए (NIA) काम करत आहे. अधिवेशनात आम्हाला काय करायचं ते करूच. ज्या गोष्टी करणे गरजेच्या आहेत, त्या करणारच असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

राऊतांनी शिवभोजनाची भाषा करू नये, मैदानात यावं
शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना भवनासमोर काल तुफान राडा झाला.
त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता प्रसाद दिलाय, पुढे शिवभोजन थाळी देऊ, असा इशारा भाजपला दिला आहे.
त्यावरही राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवप्रसाद देणाऱ्यांनी कधी घराबाहेरही यावं.
नारायण राणे यांनी शिवसेना सोडली, त्यावेळी राऊतांची अवस्था काय झाली होती हे सांगायला नको.
राऊतांनी शिवभोजनाची भाषा करू नये.
मैदानात यावं. राऊत दोन पायांवर जाणार नाहीत हे मी ठामपणे सांगतो, असा इशाराही राणेंनी ( MLA Nitesh Rane) दिला आहे.

…तेंव्हा कळेल समाजाची नाराजी
मराठा समाज असो, ओबीसी असो की धनगर समाज असो.
सर्वांना सरकारने नाराज केल आहे. ओबीसींचं आरक्षण रद्द झाल आहे.
या सगळ्या गोष्टी अति होत चालल्या आहेत.
मंत्र्यांच्या गाड्या फुटतील तेंव्हा समाज किती नाराज आहे हे कळेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Wab Title : nitesh rane reaction on encounter specialist pradeep sharma arrest say about kalanagar

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dr. Pathak eye and cataract hospital | सिंहगड रोडवरील प्रसिद्ध असलेले डॉ. पाठक डोळ्यांचे आणि मोतीबिंदू रुग्णालय चोरट्यांनी फोडले

Ram temple scam | आरोप करणाऱ्यांनो पावती दाखवा अन् देणगी परत घेऊन जा – साक्षी महाराज