Nitesh Rane | व्यासपीठावरील शिवसेना नेत्यासमोर नितेश राणेंचे युतीबद्दल वक्तव्य

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – कोकणात शिवसेना (Shivsena) आणि राणे कुटुंबीयांमध्ये (Rane Family) होणारे राडे ही काही नवी बाब नाही. शिवसेना आणि राणे हे दोघे एकमेकांवर टीका, आरोप करण्याची एकही संधी सोडत नाही. मात्र, रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे वेगळंच चित्र पहायला मिळालं. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना नेते आणि नितेश राणे (Nitesh Rane) एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी बोलताना नितेश राणे (Nitesh Rane) यांनी युतीसंदर्भात (Alliance) केलेल्या वक्तव्यावरुन सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

प्रत्येक कार्यकर्ता खांद्याला खांदा लावून काम करेल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका कार्यक्रमामध्ये भाजप आमदार नितेश राणे, शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आणि अन्य नेते उपस्थित होते. यावेळी नितेश राणे यांनी केलेल्या भाषणाची सध्या चर्चा होत आहे. व्यासपीठावर असलेले शिवसेना, भाजपचे नेते पाहून आता पुन्हा युतीची चर्चा सुरु होईल. सिंधुदुर्ग, कोकण, राज्याच्या विकासासाठी पक्षानं युतीचा आदेश दिल्यास पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता खांद्याला खांदा लावून काम करेल, असे विधान नितेश राणे यांनी केले.

रात्री त्यांना चांगली झोप लागेल

मागील काही दिवासांपूर्वी युतीची चर्चा सुरु झाली होती. परंतु मध्यंतरीच्या काळात ती बंद झाली
होती. मात्र आता भाजप, शिवसेनेचे नेते एकाच व्यासपीठावर आल्याने युती व्हावी असे ज्यांना वाटते
ते सुखावले असतील. आज रात्री त्यांना चांगली झोप लागेल, असंही राणे म्हणाले. कोकणाच्या,
राज्याच्या विकासासाठी पक्ष नेतृत्त्वानं एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यास सगळे कार्यकर्ते खांदा लावून
काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राणे यांच्या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात
जोरदार चर्चा सुरु आहे.

हे देखील वाचा

UP News | लखनऊच्या काकोरीमध्ये ATS चे मोठे ऑपरेशन, अल कायदाच्या 2 दहशतवाद्यांना पकडल्याचा दावा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Nitesh Rane | ready alliance if party leadership decides says bjp mla nitesh rane presence shiv sena leaders

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update