×
HomeशहरमुंबईNitesh Rane | सत्र न्यायालयानेही नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; अटक...

Nitesh Rane | सत्र न्यायालयानेही नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; अटक होणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना धक्का बसला आहे. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने (Sindhudurg Sessions Court) नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला (Bail Application Rejected) आहे. सोमवारी नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी (Hearing) झाली होती. आज सत्र न्यायालयाने यावर निकाल दिला. जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर अटकेची (Arrest) टांगती तलवार आहे. दरम्यान, सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात नितेश राणे जिल्हा न्यायालयात (District Court) दाद मागणार आहेत.

 

सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) नितेश राणे यांना 10 दिवसांसाठी अटकेपासून संरक्षण दिलेलं असल्याने पोलिसांना अद्याप नितेश राणेंना (Nitesh Rane) अटक करता येणार नाही. सुप्रीम कोर्टानं सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचा सल्ला दिल्यानंतर नितेश राणेंनी सिधुदुर्ग न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्यांच्या जामीन अर्जावर सोमवारी दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला. सत्र न्यायालयात दोन्ही बाजूच्या वकिलांनी तब्बल साडेपाच तास युक्तिवाद (Argument) केला. न्यायमूर्तींनी जामिनाचा निकाल मंगळवारी दिला जाईल, असे सांगत सुनावणी तहकूब केली होती. या सुनावणीदरम्यान नितेश राणे यांचे वकील सतीश मानशिंदे (Adv. Satish Manshinde) आणि सरकारी वकील प्रदीप घरत (Government Advocate Pradip Gharat) यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला होता.

 

दरम्यान, आमदार नितेश राणेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी पूर्ण झाली होती. आज सकाळीच नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब (Rakesh Parab) यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. परब यांना 4 फेब्रुवारी पर्यंतची न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय आहे प्रकरण ?
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक (Sindhudurg District Bank Election) रणधुमाळीत शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भोवऱ्यात अडकले.
18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता.
परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत (Satish Sawant) यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत.
त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात संतोष परब जखमी झाले होते.

 

Web Title :- Nitesh Rane | sindhudurg session court rejects anticipatory bail plea of bjp mla nitesh rane

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News