पुढचे काही दिवस ‘सामना’ अग्रलेखाचे ‘हे’ विषय असतील, नितेश राणेचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवल्यानंतर राज्यात याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. विरोधकांकडून आघाडी सरकार, शिवसेना, संजय राऊत यांना टार्गेट केलं जात आहेत. राज्य सरकारमुळे मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत, अशी टीका भाजपच्या नेत्यांनी केली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी यावरून पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. सुशांतच्या आत्महत्येचा संबंध महाविकास आघाडीशी जोडल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी देखील शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. आता पुढचे काही दिवस सामना आग्रलेकाचे विषय पुढील प्रमाणे असतील, मराठी अस्मिता, महाराष्ट्र धर्म आणि मराठी माणूस असं ट्विट नितेश राणे यांनी करत शिवसेनवर निशाणा साधला आहे.  नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये नाईट लाइफवरही भाष्य केले आहे.

नाइट लाइफ करताना यांना मराठी माणूस दिसला नाही किंवा मराठी कलाकार दिसले नाही. तेव्हा दिनो मोरिया, जॅकलीन आणि दिशा पाहिजे असतात, वाट लागल्यावर लगेच मराठी माणूस दिसतो, असा उपरोधक टोला त्यांनी लगावला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर नितेश राणे यांनी ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली होती. त्यांनी काही मोजक्याच शब्दात ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला होता. राणेंनी ट्विटमध्ये म्हटले होते, अब बेबी पेंग्विन तो गियो…. इट्स शो टाईम असं नितेश राणे यांनी म्हटले होते.