नारायण राणेंचा फोटो ट्विट करत नितेश राणे म्हणतात ‘अब आयेगा मजा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यात कलम 356 लागू करण्याची शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केल्यानंतर राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिली. राष्ट्रपतींच्या मंजुरीमुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये सत्ता स्थापनेसाठीच्या घडामोडींना वेग आला. याच दरम्यान नितेश राणे यांनी ट्वीट करत ‘अब आयेगा मजा’ असे म्हटले आहे. विशेष म्हणजे नितेश राणे यांनी नारायण राणे यांचा फोटो शेअर करत हे ट्विट केले आहे.

नितेश राणे यांनी अशा प्रकारे ट्विट केल्यामुळे नेमके त्यांना काय सुचावयचे आहे अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान, भाजप सरकार स्थापन करणार, त्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रीया नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेस -राष्ट्रवादीचे नेते तोंडावर एक बोलता आणि मागे एक बोलतात. सेनेला ते उल्लू बनवत आहे, अशी टीका राणेंनी केली. तसंच शिवसेना ही काँग्रेससोबत जाणार नाही, असा विश्वासही राणेंनी व्यक्त केला.

काय म्हणाले नारायण राणे ?
नारायण राणे म्हणला, मुख्यमंत्र्यांच्या भेटी दरम्यान त्यांनी सत्ता स्थापनेसाठी प्रतत्न करु असे सांगितले. त्यामुळे भाजप सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणार आहे. लवकरच भाजपचं सरकार स्थापन होईल. भाजपची सत्ता येण्यासाठी जे करावं लागेल ते मी करेन. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भाजप सरकार स्थापन करणार असून कामाला लागा असे सांगितले असल्याचे नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like