Nitesh Rane | आमच्यावर भुंकण्यासाठी भटकी कुत्री, सोंगाडे आणले, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – कुडाळ तालुक्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांच्या समर्थनार्थ मोर्चा निघाला होता. यावेळी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांच्या दोन पुत्रांवर मोठे आरोप आणि टीका केली. याला भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बाळासाहेबांसारखा थेट हल्ला करण्याची हिंमत उद्धव ठाकरेमध्ये (Uddhav Thackeray) नाही, त्यामुळे त्यांना अशी भटकी कुत्री आणि सोंगाडे लागतात, अशा शब्दात नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

 

भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आमच्यावर भुंकण्याचे काम करुन गेले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही बघत आहोत, उद्धव ठाकरे स्वत:ला मर्द म्हणवतात. मात्र, त्यांच्याकडे बाळासाहेबांसारखा थेट हल्ला करण्याची हिंमत नाही. त्यांना अशी भटकी कुत्री आणि सोंगाडे लागतात. जे येऊन राणेंवर प्रहार करणार. भाजपावर (BJP) आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेवर प्रहार करणार आणि उद्धव ठाकरे मातोश्रीवर बसून मजा करणार, असे नितेश राणे म्हणाले.

 

भास्कर जाधव म्हणतात की मी शिक्षकाचा मुलगा आहे. पण मला वाटत नाही की, शिक्षकाचा मुलगा एवढा वात्रट आणि कार्टा असेल. शिक्षक असलेल्या वडिलांनी भास्कर जाधव यांच्यावर काय संस्कार केले, ते खरेच शिक्षकाचा मुलगा आहेत की, चिपळूणच्या करचऱ्यातून उचलला आहे, हा संशोधनाचा विषय आहे. महाराष्ट्राच्या जनतेला कळाले आहे की, नेमके उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाने (Election Commission) आईस्क्रिमचा कोन चिन्ह म्हणून का दिले. उद्धव ठाकरेंमध्ये रग नाही. हिंमत नाही. उद्धव ठाकरे एकदम थंड माणूस आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहून आईस्क्रिमचा कोन दिला असेल, असेही राणे म्हणाले.

दरम्यान, वैभव नाईक यांच्यावर सुरु असलेल्या लाचलुचपत विभागाच्या (Anti Corruption Bureau) कारवाईवर देखील राणे यांनी भाष्य केले.
वैभव नाईकांनी चोऱ्या माऱ्या करायच्या, भ्रष्टाचार करायचा आणि ही भटकी कुत्री आमच्यावर भुंकत बसणार.
त्यापेक्षा वैभव नाईक यांनी त्यांच्या मालमत्तेची माहिती दिली पाहिजे. 2009 ते 2019 मध्ये त्यांची संपत्ती कशी काय वाढली,
त्याची माहिती त्यांच्या मतदार संघातील जनतेला दिली पाहिजे, असे राणे म्हणाले.

 

Web Title :- Nitesh Rane | uddhav thackeray considers himself a man but nitesh ranes venomous reply after bhaskar jadhavs criticism

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंना क्रेडिट जाऊ नये म्हणूनच पवारांची पत्रकार परिषद; संदीप देशपांडेंचा आरोप

Uddhav Thackeray | चिन्ह गोठवलं आणि निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढला, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

Pune Crime | ताडपत्री चोरण्याचा जाब विचारल्याच्या रागातून रॉडने मारहाण, कोंबडी पुलावरील घडना