सरकारी नोकरीची ‘सुवर्णसंधी’ ! २ लाख रूपये पगाराची ‘नीति’ आयोगात नोकरी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्हाला देखील आता मिळू शकतो लाख रुपयांचा पगार, तो ही सरकारी नोकरीतून. याशिवाय तुम्हाला या पदावर निवड झाल्यास तुम्हाला जाण्या येण्याची सुविधा देखील मिळेल. तर आठवड्याला ५ दिवस काम करावे लागेल. ही नोकरी आहे थेट नीति आयोगात.

नीति आयोगाकडून Senior Specialist/ Specialist in Flexi Pool पोस्ट साठी अर्ज मागवण्यात आले आहे. या पदांची संख्या १६ आहे. या पदांवर होणारी भरती रेग्युलर आणि काँट्रॅक्ट बेसेस या दोन्ही आधारे होणार आहे. सुरुवातीला काँट्रॅक्ट ३ वर्षांसाठी आहे. ज्याला नंतर ५ वर्ष वाढवण्यात येऊ शकते.

काँट्रॅक्टच्या आधारे भरती करण्यात आलेल्या उमेदवारांना रेजिडेंशियल एकोमोडेशन, ऑफिशियल ट्रांस्पोर्ट, leave Encashment या इतर भत्त्यांची सुविधा मिळणार नाही. ही सुविधा नियमित सरकारी कर्मचाऱ्यांना मिळेल. सुट्ट्यांमध्ये जे नियम सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतात ते काँट्रॅक्टच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्यांना मिळणार नाही.

अर्ज भरण्याची प्रक्रिया –
काँट्रॅक्ट बेसेसवर अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना NITI Aayog च्या आधिकृत वेबासाइट niti.gov.in वर पाहावे लागेल. वेबसाइटवर करिअर म्हणून एक लिंक दिलेली असेल. त्यावरुन तुमचा अर्ज दाखल करा. अर्जाबरोबर उमेदवाराला साक्षांकित प्रती अपलोड कराव्या लागतील.

senior specialist पदांसाठी पे लेवल १,२३,१०० – २.१५,९०० रुपये असेल. यासाठी उमेदवाराकडे MBBS, इंजिनियरिंग किंवा टेक्नोलॉजी मध्ये मास्टर्सची डिग्री असणे आवश्यक आहे. याशिवाय मॅनेजमेंटचा २ वर्षांचा पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा असावा. उमेवाराचे वय ३३ वर्षपेक्षा कमी आणि ५० वर्षापेक्षा आधिक नसावे. उमेदवाराकडे १० वर्षांचा अनुभव हवा.

वेतन –
Specialist पदाच्या उमेदवारांचा पगार १,४५,००० रुपये मिळेल, पे लेवल १२ म्हणजेच ७८,८०० – २,०९२०० रुपये असेल. यासाठीचे शैक्षणिक पात्रता वरील पदासाठी आहे तीच आहे. उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा कमी आणि ५० वर्षांपेक्षा आधिक नको. यासाठी 8 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

आरोग्यविषयक वृत्त –