रेशन दुकानात ‘स्वस्त’ दरात मिळणार ‘अंडी’, ‘मासे’ आणि ‘चिकन’, नीती आयोगाचा प्रस्ताव ‘रेडी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लवकरच आता राशनच्या दुकानात लोकांना अंडी, चिकन, मासे, कोंबडी आणि मटण मिळण्याची शक्यता आहे. नीती आयोग एक प्रस्ताव तयार करत आहे ज्याचा हेतू आहे की, दारिद्र्य रेषेखालील लोकांना स्वस्तात प्रोटीन खुराक मिळावा. पुढील वर्षी हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. एक एप्रिल 2020 पासून पूर्ण देशात लागू होणार आहे.

पीडीएस मध्ये मिळणारे खाद्यपदार्थ वाढवण्याचा उद्देश

नीती आयोगातील मोठ्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे राशन दुकानावर मिळणारे गहू, तांदूळ, हरभरा, डाळ आणि साखर यातून लोकांना योग्य प्रमाणात प्रोटीन खुराक मिळत नाही. त्यामुळे गरिबांना योग्य प्रमाणात प्रोटीन खुराक मिळावा यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

‘या’ कारणामुळं गरजेचं
एका इंग्रजी वृत्तानुसार, नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद्र म्हणाले, “प्रत्येक 10 पैकी 4 मुलांमध्ये प्रोटीनची कमतरता आहे. मुलं जास्त करून जंक फूड खातात. यात तेल, साखर, मसाला यांचा भडीमार असतो. जर राशनच्या दुकानात अंडी, मटण, मासे स्वस्त दरात दिले गेले तर यामुळे कुपोषणची समस्या दूर होईल. परंतु स्वस्त दरात खाद्य पदार्थ विक्रीवर सध्या सरकारला 1.84 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/