Nitin Deshmukh | ठाकरे गटाच्या आमदाराने राणे समर्थकाला दिलेला शब्द पाळला; सांगितल्याप्रमाणे नितीन पाटील नरीमन पॉईंटवर आले अन्…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांना दि.०५ फेब्रुवारी रोजी राणे समर्थक असल्याचे सांगत फोन आला होता. त्यात नितिन देशमुख (Nitin Deshmukh) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र त्या धमकीनंतर नितीन देशमुख यांनी त्या धमकी देणाऱ्यालाच थेट प्रतिआव्हान दिले. त्यानुसार त्या धमकीदाराला सांगितल्यानुसार, आज मंगळवारी ते नरीमन पाँईंट (Nariman Point) येथे दाखल झाले. मरेन पण दिलेला शब्द मागे घेणार नाही. असे म्हणत नितीन देशमुख यांनी दीड तास राणे समर्थकांची वाट पाहिली. मात्र कुणीही त्याठिकाणी आले नाही. यावेळी नितीन देशमुख यांच्याकडून कुठलेही पोलिस संरक्षण घेण्यात आले नव्हते.
ठाकरे गटाचे आमदार नितीन पाटील यांना दोन वेगवेगळ्या फोन नंबरवरून धमकी देण्यात आली होती. दि.५ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता एका अज्ञात व्यक्तीने नितीन देशमुख यांना धमकीचा फोन केला. यावेळी नितीन देशमुखांनी आपण मंगळवारी सकाळी १० वाजता मुंबईला नरीमन पाँईंटला भेटायला येत असल्याचे प्रतिआव्हान धमकी देणाऱ्याला दिले होते. मात्र धमकी मिळाल्यानंतर देखील त्यांनी पोलिस संरक्षण नाकारले होते. तसंच नितीन देशमुखांनी (Nitin Deshmukh) अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना धमकीच्या या फोनची कल्पना दिली होती.
काही दिवसांपूर्वी नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर
केलेल्या टीकेनंतर आमदार नितीन देशमुखांनी त्याला प्रतिउत्तर दिले होते.
यावर बोलताना नितीन देशमुखांनी राणे कुटुंबाबद्दल वादग्रस्त विधान केले होते.
या विधानानंतर आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
धमकीला प्रतिउत्तर देताना मंगळवारी १० वाजता नरीमन पाँईंटला येणार आहे. असे सांगितले होते.
ठरल्याप्रमाणे ते आज नरीमन पाँईंटला आले होते. त्यांनी जवळपास दीड तास राणे समर्थकाची वाट पाहिली.
पण तेथे कोणीही फिरकले नाही. असे यावेळी बोलताना नितीन देशमुख म्हणाले.
Web Title :- Nitin Deshmukh | balapur shivsena mla nitin deshmukh completed the challenge given to rane supporter in mumbai
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update