मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Nitin Deshmukh – काल पत्रकार परिषदेत बोलताना भाजपनेते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे हे ना### आहेत. असं म्हटलं होतं. आता त्यांच्या याच वक्तव्यावर ठाकरे गटाचे बुलढाण्याचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी जोरदार टीका केली आहे.
यावेळी बोलताना नितीन देशमुख म्हणाले की, ‘नारायण राणे आणि नितेश राणेंचा चेहरा पाहिला तरी महाराष्ट्रीयन सोडा हिंदुस्थानीही वाटत नाहीत. वारंवार चुकीच्या पद्धतीने बोलत असतात. नितेश राणे स्वत:लाच साहेब म्हणतात. हे भाजपाचे तळवे चाटत आहेत. काँग्रेसमध्ये तळवे चाटून महसुलमंत्रीपद मिळवलं. आता तळवे चाटल्याने केंद्रात मंत्री केलं.’ अशी टीका राणे पिता-पुत्रांवर यावेळी बोलताना आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी केली.
दरम्यान, काल माध्यमांशी संवाद साधताना भाजप आमदार नितेश राणे यांची जीभ घसरली होती. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांच्यावर जोरदार टीका केली होती. ते म्हणाले होते की, ‘दुसऱ्यांची घरं पाडण्याची तक्रारी देणाऱ्या लोकांबरोबर कधीतरी नियती खेळ करत असतेच. आमचं, कंगणाचं घर तोडलं. कधी कोणाला अट केली. अनिल परब हे ‘मातोश्री’चे कारकून आहे. उद्धव ठाकरेंमधे हिंमत नाही. उद्धव ठाकरे हे ना### आहेत. त्यांना अनिल परबांसारखे कारकून लागतात. त्यामुळे अनिल परबांचं घर झाकी है,‘मातोश्री’ २ बाकी है. ‘मातोश्री’-२ मध्ये कोणत्याही शिवसैनिक आणि शिल्लक सेनेच्या नेत्याला प्रवेश नाही.’ असा घणाघात त्यांनी यावेळी बोलताना ठाकरे गटावर केला होता.
तर, ‘आमचं सरकार आल्यापासून महाराष्ट्राचं राजकारण सुरुळीत आहे.
हिंदूत्ववादी विचाराचं सरकार महाराष्ट्रात आलं आहे. महाराष्ट्राला कोणीही वाकड्या नजरेने पाहणार नाही,
याची आम्ही काळजी घेऊ.’ असंही ते यावेळी पुढे बोलताना म्हणाले होते.
त्यावरचं आज माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली.
Web Title :- Nitin Deshmukh | nitin deshmukh attacks narayan and nitesh rane over uddhav thakceray comment
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Shubman Gill | शुभमन गिलने शतकी खेळी करत ‘हे’ विक्रम केले आपल्या नावावर; दिग्गजांनाही टाकले मागे