Nitin Deshmukh | शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती स्वतः आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी माध्यमांसमोर दिली. तर ही धमकी मला मी राणे कुटुंबाविरोधात बोलल्यामुळे देण्यात आली आहे. असा संशय देखील यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला. ते आज दि.०५ माध्यमांसमोर बोलत होते.

 

यावेळी बोलताना आमदार नितीन देशमुख म्हणाले की, ‘आज सकाळी ११.३० ते १२.०० च्या सुमारास मला दोन वेगवेगळ्या नंबरवरून फोन आले. त्यांनी नारायण राणे (Narayan Rane) आणि नितेश राणे (Nitesh Rane) यांचे नाव घेऊन मला जीवे मारण्याची धमकी दिली. आम्ही अनेक लोकांना मारून समुद्रात फेकून दिले आहे. त्यांचा पत्ता अद्याप लागला नाही. तुम्ही मुंबईत आल्यानंतर तुमचाही तसाच समाचार घेऊ.’ अशी धमकी देण्यात आली असल्याची प्रतिक्रिया यावेळी माध्यमांशी बोलताना नितीन देशमुख यांनी दिली.

 

तर यावर पुढे बोलताना ते (Nitin Deshmukh) म्हणाले की, ‘तर धमकी देणाऱ्यांना प्रतिउत्तर देताना मी म्हणालो की, मी मंगळवारी मुंबईला येत असून तुम्ही नारायण राणे, नितेश राणे यांना घेऊन रात्री ८ ते १० दरम्यान नरीमन पॉईंटवर (Nariman Point) या असे आव्हान मी धमकी देणाऱ्यास दिले. असे नितीन देशमुख यांनी सांगितले. तसेच यावेळी बोलताना त्यांनी ते उद्या मुंबईला जाणार असल्याची देखील माहिती दिली.

कोण आहेत नितीन देशमुख?
नितीन देशमुख हे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्याचे आमदार असून ते शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) अकोला जिल्हाप्रमुख आहेत.
शिवसेना पक्षात फुटीनंतर सुरत येथून शिंदे गटातून बाहेर पडण्यात ते यशस्वी झाले होते.
शिवसेना पक्षाचा विदर्भातील महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणुन देखील त्यांना ओळखले जाते.

 

Web Title :- Nitin Deshmukh | thackeray group mla nitin deshmukh get death threat by unknown call

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Eknath Khadse | ‘…त्यावेळी भाजपला बिनविरोधची आठवण झाली नाही;’ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची भाजपवर टीका

Prakash Ambedkar | कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले…

Pune Crime News | चोर्‍या करणार्‍या तडीपार गुन्हेगाराकडून 3 गुन्हयांची उकल; समर्थ पोलिसांची कामगिरी