Nitin Gadkari- 3D Imagingfacility Launch | नितीन गडकरी यांनी घेतला ‘थ्रीडी इमेजिंग’ वाहन प्रशिक्षणाचा अनुभव; केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेत सुविधेस प्रारंभ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Nitin Gadkari- 3D Imagingfacility Launch | नाशिकफाटा, भोसरी रस्ता येथील केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेत (सीआयआरटी) बसवण्यात आलेल्या दोन आधुनिक व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी सिम्युलेटरचे उदघाटन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी करण्यात आले. यावेळी गडकरी यांनी स्वत: थ्रीडी व्हीआर प्रशिक्षणाचा अनुभव घेतला. तसेच येथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून प्रशिक्षणाविषयी माहिती घेतली. (Nitin Gadkari- 3D Imagingfacility Launch)

तत्पूर्वी गडकरी यांनी भारत न्यू कार असेसमेंट कंट्रोल सेंटरला भेट दिली. त्यानंतर रस्ते वाहतूक सुरक्षेच्या अनुषंगाने उपाययोजना केलेल्या एका वाहनातून प्रवास केला. यावेळी वाहनाचे सारथ्य सचिव संकेत भोंडवे यांनी केले. (Nitin Gadkari- 3D Imagingfacility Launch)

देशातील सर्वाधिक अपघात मानवी चुकांमुळे होतात. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय त्यावर उपाययोजना करते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे समुपदेशन आणि जनजागृती केली जाते. अपघात रोखण्यासाठी चालकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे प्रशिक्षण देण्यासाठी भोसरीतील केंद्रात दोन सिम्युलेटर बसविले आहेत.

काय आहे थ्रीडी इमेजिंग प्रशिक्षण

चालकांना निरनिराळ्या वातावरणात, परिस्थितीत आणि ठिकाणी वाहन चालवताना येणारे अनुभव थ्रीडी इमेजिंगद्वारे घेता येणार आहेत. एकाच मशीनवर विविध वाहनांचे प्रशिक्षण, तसेच दिवसा आणि रात्री वाहन चालविण्याचा थ्रीडी इमेजिंगद्वारे अनुभव मिळणार आहे. चालकांच्या वर्तनाचे विश्लेषण करता येणार आहे. वाहन चालवताना अपघातापूर्वी धोक्याची माहिती देण्यात येणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dhangar Reservation | धनगर आरक्षणाचे आंदोलक संतप्त, विखे-पाटील न आल्याने सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

Pune Metro- Ganeshotsav 2023 | पुणेकरांनो लाडक्या बाप्पाला आणा मेट्रोमधून, पुणे मेट्रोकडून नियमावली जाहीर

ACB Trap Case | PhonePe वर लाच घेणाऱ्या विशेष वसुली व विक्री अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक

ऑनलाइन टास्क देत तरुणाची 31 लाख 30 हजारांची फसवणूक, हडपसरमधील प्रकार

पत्नीला मारहण करणाऱ्या पतीला न्यायालयाचा दणका, घरात प्रवेश बंदी

Nashik Crime News | पती, पत्नी आणि त्याची गर्लफ्रेण्ड…, सततच्या छळा वैतागून तिनं उचललं टोकाचं पाऊल; नाशिक शहरात खळबळ

ACB Trap Case | ग्रॅज्युटीच्या फरकाची रक्कम देण्यासाठी लाच घेताना उपकोषागार अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात