‘फायरब्रँड’ नेते नितीन गडकरी सध्या आहेत कोठे ? निवडणुकीपासून दूर ठेवल्याची चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात यशस्वी मंत्री म्हणून विरोधकांकडूनही प्रशंसा मिळविलेले आणि स्पष्टवक्ते केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी सध्या कोठे आहेत, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.भाजपाचे देशभरातील मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री महाराष्ट्रात प्रचारासाठी ठाण मांडून बसले असताना राज्यातील प्रमुख नेते असलेले नितिन गडकरी हे कोठेही प्रचारात दिसत नाही. त्यामुळे अतिशय स्पष्टवक्ते असलेल्या गडकरी यांच्यामुळे भाजपाच अडचणीत येऊ शकतो, असे वाटून त्यांना प्रचारापासून दूर ठेवले आहे की त्यांच्या प्रकृतीचे कारण यामागे आहे, याविषयी स्पष्टीकरण भाजपाने दिलेले नाही.

लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांच्याविरोधात भाजपातून काँग्रेसमध्ये गेलेल्या नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्यावर त्यावेळी टिका करताना नितिन गडकरी यांनी ज्यांना ज्या पक्षाने घडवले ते त्या पक्षाचे होऊ शकले नाही. ते जनतेचा काय होणार अशी टिका करताना पक्षांतर करणाऱ्याना पाडा असे त्यांनी म्हटले होते. लोकसभेत त्यांचे हे वक्तव्य खूप व्हायरल झाले होते.

आता विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यावर त्यांचे हे वक्तव्य व त्या जोडीला काँग्रेस,राष्ट्रवादीमधून आलेल्यांना सरसकट पाडा, नाहीतर निष्ठावंतांनो तुम्हाला सतरंज्याच उचलाव्या लागतील असे वक्तव्य असलेले पोस्टर व्हायरल होत आहे. दुसरीकडे नितिन गडकरी यांच्याबाबत राज्यात सर्वाधिक विश्वासार्हता असतानाही त्यांना प्रचारापासून दूर ठेवलेले दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीनंतरच्या नरेंद्र मोदी सरकार २ मध्ये नितीन गडकरी यांच्याकडे पूर्वीची खाती दिली गेली असली तरी त्यांच्या खात्यावर लगाम घालण्याचा प्रयत्न पंतप्रधान कार्यालयाकडून सुरु असल्याचे सांगितले जाते. त्यावर गडकरी यांना खुलासा करण्याची वेळ आली होती.

महाजनादेश सांगतेच्यावेळी नाशिकला पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थिती असताना ते तेथे आले नव्हते. त्यानंतर निवडणुकीतील उमेदवारांच्या निवड समितीत सहभाग असला तरी कोअर कमिटीत त्यांचा सहभाग नव्हता. गडकरी यांचे निकटवर्तीय बावनकुळे यांना तिकीट नाकारण्यात आले.

विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नागपूरमधील सर्व भाजपाचे उमेदवार गडकरी यांच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांनी सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर ते प्रचारामध्ये दिसले नाहीत.

योगी आदित्यनाथपासून अनेक राज्यातील मुख्यमंत्री, पदाधिकारी राज्यात प्रचार करताना दिसत आहे. अशावेळी गडकरी यांना प्रचारात का सहभागी करुन घेतले गेले नाही याविषयी आता चर्चा सुरु झाली आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like