आता गरीबांना मिळणार सहजकर्ज, मोदी सरकारनं सांगितली पध्दत, सुरू केली ‘ही’ खास सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी गरीबांना सहजपणे लोन देण्याचा उपक्रम सुरू करण्याचा प्लॅन तयार केला आहे. सामाजिक संस्थांद्वारे गरीबांना छोटे कर्ज (मायक्रो फायनान्स) सहजपणे उपलब्ध करण्यावर जोर दिला आहे. रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग तथा एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) मंत्री म्हणाले की, याबाबत त्यांची निती आयोगाचे सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) अमिताभ कांत, उपाध्यक्ष राजीव कुमार तसेच टाटा समूह आणि आयआयटीसोबत चर्चा झाली आहे. गडकरी म्हणाले, ते आता असे धोरण आखत आहेत, ज्याच्या आधारावर रिझर्व्ह बँक सार्वजनिक सूक्ष्म आर्थिक संस्थांसाठी सहज मंजूरी, लायसन्स देऊ शकते.

एमएसएमई क्षेत्रासाठी आणखी पैशांची गरज
डिजिटल पद्धतीने वेब पोर्टलच्या शुभारंभाच्या प्रसंगी आपल्या भाषणात गडकरी म्हणाले, बँका आणि नॉन-बँकिंग आर्थिक कंपन्या चांगले काम करत आहेत. परंतु त्यांच्यावर खुप दबाव आहे. गडकरी म्हणाले, वेब प्लॅटफार्मच्या सोबत एक पारदर्शक, कालबद्ध आणि परिणामकारक कम्प्युटरराईज्ड प्रणालीची गरज आहे, जेथे एक सूक्ष्म आर्थिक संस्था सुरू करता येईल, जी गरीब लोकांना सहज कर्ज देऊ शकते. प्रत्यक्षात ही काळाची गरज आहे. यावेळी गडकरी यांनी एमएसएमई क्षेत्रासाठी रोख रक्कमेच्या गरजेकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, हे क्षेत्र देशाच्या सकल स्थानिक उत्पादनात 30 टक्क्यांचे योगदान देत आहे.

गडकरींचा मार्केटिंगवर जोर
यापूर्वी गडकरी म्हणाले की, फार्मर-प्रोड्यूसर कंपनी (पीएफसी) द्वारे बनवण्यात आलेल्या वस्तूंचे अशाप्रकारे मार्केटिंग केले गेले पाहिजे की, त्यांच्या उत्पादनाचा खर्च कमी करता येईल. त्यांनी वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्याच्या पीएफसीच्या प्रतिनिधींना आवाहन केले की, त्यांनी उत्पादन वाढवण्यासोबतच उत्पादनाचा खर्च कमी करण्यावर जोर द्यावा. गुणवत्तेशी तडजोड न करता कमी खर्चात स्थानिक बाजारात माल उपलब्ध केला पाहिजे. सरप्लस उत्पन्न निर्यात केले पाहिजे.