Nitin Gadkari | महाराष्ट्र सरकारवरील संकट केव्हा दूर होणार?; ‘आगे आगे देखिए होता है क्या…’ नितीन गडकरींचं थेट उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nitin Gadkari | राज्याच्या राजकारणात राजकीय संकट (Maharashtra Political Crisis) निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) धोक्यात आलं आहे. भाजप (BJP) सोबत युती करण्याची भूमिका एकनाथ शिंदेंची असल्याची चर्चा आहे. दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया भाजप नेत्याकडून देण्यात येत नाही. त्यामुळे राज्यात सत्तांतर होईल का? याबाबत चर्चा पसरल्या आहेत. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर आलेल्या संकटाबाबत मात्र केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

नितीन गडकरी (Nitin Gadkari) बोलताना म्हणाले की, “मला वाटते, की महाराष्ट्र सरकारवरील संकट लवकरच दूर होईल,” या दरम्यान, हे संकट आपण दूर कराल का? असा सवाल केला असता “आगे-आगे देखो होता है क्या.” असं विधान गडकरी यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यसभा, विधान परिषद निवडणूक निकालात जसा भाजपने चमत्कार केला. तीच पद्धत राज्यातील सत्तांतर होण्यास होईल का? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

 

“आजच्या समस्येत उद्याची उत्तरं लपलेली असतात. लवकरच सर्वच प्रश्नांची उत्तरं मिळतील.
आलेले ढग दूर होतील. अंधकार नष्ट होईल आणि सूर्य उगवेल. सीएम ठाकरेंवर घोंगावणारे ढगं दूर होतील.
अस गडकरा यांनी म्हटलं आहे. आपले आणि त्यांचे संबंध अगदी जवळचे आहेत, असे मानले जाते? यावर गडकरी म्हणाले की, वेयक्तिक संबंध, हे राजकीय संबंधांपेक्षा वेगळे असतात. मग ते सरकारमध्ये असोत अथवा नसोत. संबंध तसेच असतात.” असं ते म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारवर आलेल्या संकटामागे भाजप आहे का? असा सवाल केल्यानंतर “मी महाराष्ट्रातील राजकारणावर अधिक भाष्य करणार नाही.
मात्र, मी एवढे नक्की सांगेन, की जर शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र आले,
तर माझ्यासारख्या व्यक्तीला नक्कीच आनंद होईल.” असं देखील नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Nitin Gadkari | BJP leader and union minister nitin gadkari reaction on maharashtra political ciris

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Airtel 365 Days Plan | एक वर्षाच्या व्हॅलिडिटीचा सर्वात स्वस्त प्लान, मिळतील अनलिमिटेड कॉल्स, जाणून घ्या किंमत

 

Pune Crime | तोतया अँटी करप्शनची रेड पोलिसांच्या दक्षतेने टळली; पोलिसांना पाहून बनावट पोलिसांनी ठोकली धुम

 

Cryptocurrency Market | क्रिप्टोकरन्सी मार्केट मागील 3 दिवसांपासून पॉझिटिव्ह, लागोपाठ वाढत आहे इथेरियमचा डॉमिनन्स