विधानसभा 2019 : ‘यांनाच’ मिळणार उमेदवारी, गडकरींचा इच्छूकांना ‘सूचक’ इशारा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून इच्छूकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातून अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेश केलेल्या प्रत्येक नेत्याला आपल्यालाच विधानसभेची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आहे. तसेच कार्यकर्त्यांमध्ये देखील कुणाला उमेदवारी मिळणार यावर चर्चा सुरु झाल्या असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इच्छूक उमेदवारांना सूचक इशारा दिला आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीचा उत्साह दिसून येत आहे. तिकीट कुणाला मिळणार याची चर्चा सुरु झाली आहेत. आशीर्वाद मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण भाजपमध्ये तिकीट वाटपसाठी कोणताही ‘कोटा’ नाही. कामाचे मूल्यांकन होऊन तिकीट वाटप केले जाईल, असे गडकरी यांनी नागपूरमधील विजय संकल्प मेळाव्यात स्पष्ट केले.

राजकारणातील घरणेशाहीवरून नेहमीच टीका होत असते. बड्या नेत्याच्या मुलांना, सुनांना तिकीट मिळवणे काहीच अवघड नाही. मात्र, भाजपमध्ये नेत्यांच्या मुलांना किंवा पत्नीला तिकीट दिले जात नाही. जनतेनेच जर तशी मागणी केली तर बड्या नेत्यांच्या कुटुंबीयांना तिकीट देण्याबाबत पक्षाकडून विचार केला जाऊ शकतो.

पुन्हा देवेंद्र CM
भाजप-शिवसेना युतीमध्ये जागावाटप ठरले नाही. 50-50 चा फॉम्युला बाजूला ठेवून भाजपने शिवसेनेपुढे कमी जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. भाजपचा प्रस्ताव शिवसेनेला मान्य नसला तरी आगामी विधानसभा निवडणुक दोन्ही पक्ष एकत्र लढवतील. राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत येईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

Visit – policenama.com