खळबळजनक गौप्यस्फोट ! रस्त्याचं काम सुरू होण्यापुर्वीच ‘आमदार-खासदार’ टक्केवारी मागतात, नितीन गडकरींनी सांगितलं

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे फायरब्रॅन्ड नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे स्पष्टोक्ते असून ते त्यांच्या बिनधास्त वक्तव्यांसाठी प्रसिध्द आहेत. कुठलीही तमा न बाळगता ते बेधडक बोलतात. त्यांच्या या स्वभावामुळे ते काही वेळा अडचणीत देखील सापडले आहेत आणि त्यामधून वाद देखील निर्माण झाला आहे.

आज देखील त्यांनी एक बेडधक वक्तव्य करत खळबळ उडवून दिली. खासदार आणि आमदार टक्केवारी मागतात असं त्यांनी सांगितल्यानं भ्रष्टाचाराचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी भ्रष्टाचाराविरूध्द आपण युध्द छेडल्याचं सांगत असतात. दरम्यान, नितीन गडकरींनी हे वास्तव सांगितल्यानं राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. ते औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

कोणतेही काम असो स्थानिक आमदार आणि खासदार संबंधित कॉन्ट्रॅक्टरला पहिल्यांदा भेटायला बोलवतात. आता त्यांची ही भेट काय असते हे गुपित राहिलेलं नाही. त्यांना टक्केवारी हवी असते. अशा प्रकारांमुळे कॉन्ट्रॅक्टर सोडून जातात. यामुळे आपण स्वतः वैतागलेलो आहोत असेही गडकरी म्हणाले. अशा लोकांविरूध्द आवश्य कारवाई करा, ते सापडले तर त्यांच्यावर छापे टाका असं आपण केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संभाचालकांना सांगितल्याचं देखील ते म्हणाले.

पुढे जाऊन ते म्हणाले हे मी विदर्भ किंवा इतर महाराष्ट्रातलं सांगत नसून मराठवाड्यातलं सांगतो आहे. अधिकारी देखील फाईल्स आडवून ठेवतात. त्यांची भुमिका देखील सकारात्मक नसते अशा अधिकार्‍यांना मीच दम दिला होता. त्यानंतर मोठा वाद झाला होता असंही ते म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/