शास्त्रज्ञांनी पुन्हा एकदा सिद्ध केले – आपला देश सक्षम : नितीन गडकरींकडून शास्त्रज्ञांचे अभिनंदन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंतराळ विज्ञान क्षेत्रात भारताचा प्रवेश झाला आहे. भारताने अँटी सॅटेलाईट मिसाईल लाँच केले आहे. सॅटेलाईट पाडणारा भारत चौथा देश ठरला आहे. अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. भारतीय शास्त्रज्ञांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अभिनंदन केले आहे.

मिशन शक्तीविषयी नितीन गडकरी म्हणाले की, ‘ऐतिहासिक ” यशस्वी केल्याबद्दल आपल्या शास्त्रज्ञांचे आणि देशातील जनतेचे अभिनंदन. आपण एक अवकाशात उपग्रह नष्ट केला आहे, याचा अर्थ आम्ही कोणत्याही प्रकारच्या संकटाचा सामना करण्यासाठी तयार आहोत. ‘

अंतराळात मिशन शक्ती यशस्वी केलेल्या DRDO च्या शास्त्रज्ञांचे कौतुक करताना नितीन गडकरी म्हणाले की, ‘हे मिशन भारताच्या लष्करी आणि स्पेस क्षमतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे, आपल्या शास्त्रज्ञांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की आपला देश सक्षम आहे.’

मिशन शक्ती –

अंतरिक्षात 300 किमी अंतरवरील सॅटेलाइट भारताने उद्ध्वस्त केला. भारताने स्वत:चाच सॅटेलाइट नष्ट केला. यातून भारताने अंतराळातील आपली पोहोच जगातील देशांना दाखवली आहे. सॅटेलाइट पाडण्याचे किंवा अशा प्रकारची चाचणी ही युद्धावेळी वापरली जाते. शत्रू राष्ट्रावर धाक बसवण्यासाठी भारताने मिशन शक्ती केले. ही चाचणी करत असताना कोणत्याही आंतरराष्ट्रीय नियम किंवा संधीचे भारताने उल्लंघन केलं नाही.