मैदानावरही नितीन गडकरींची अशीही ‘फटकेबाजी’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – बिनधास्त आणि कोणाचीही पर्वा न करताना राजकारणाच्या मैदानावर टोलेबाजी करण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी माहीर आहेत. पण आपण केवळ राजकारणाच्या मैदानात सभासमारंभातूनच टोलेबाजी करतो असे नाही तर प्रत्यक्ष क्रिकेटच्या मैदानातही तशीच ‘टोलेबाजी’ करु शकतो, हे त्यांनी रविवारी रात्री दाखवून दिले.

खासदार क्रीडा महोत्सवानिमित्त नागपूरमध्ये क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती नगर मैदानात फ्लड लाईटच्या प्रकाशात झालेल्या या स्पर्धेच्यावेळी गडकरी यांनी बॅट हातात घेतली आणि मैदानाच्या चहुबाजूंना फटके मारले. चेंडु फुल टॉस येऊ नाही तर शॉट पिच त्यांनी सर्व चेंडु अगदी लिलया फटकावले. राजकारणात आपण पक्के खिलाडी असलो तरी मैदानातही तितकेच खेळाडु आहोत, हे त्यांनी दाखवून दिले.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like