‘त्या’ समितीत महाराष्ट्राचे ‘परिवहन मंत्री’ही होते, नितीन गडकरींचा दिवाकर रावतेंना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यातील सुधारणा महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या नाहीत. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या कायद्यानुसार कारवाईला स्थगिती दिली आहे. त्यावर नितीन गडकरी यांना टोला मारला आहे. गडकरी म्हणाले, या सुधारणांचे स्वरुप २० राज्यांच्या परिवहन मंत्र्यांच्या समितीने निश्चित केले आहे. त्यात महाराष्ट्राचेही परिवहन मंत्री होते. असे सांगत दिवाकर रावते यांचा पोलखोल केला आहे.

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लवकर होत आहे. येत्या ५ – ६ दिवसात निवडणुकांची घोषणा होऊन आचार संहिता लागणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांचा रोष होऊन त्याचा विपरीत परिणाम होऊन नये, म्हणून या दुरुस्तीला रावते यांनी स्थगिती दिली आहे.

बिनधास्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नितिन गडकरी यांनी दिवाकर रावतेच्या या नंतर सुचलेल्या शहाणपणावर नेमके बोट ठेवले आहे. या समितीत काम करताना त्यावेळी त्यांना हे लक्षात आले नाही, आता लोकांचा रोष लक्षात आल्यावर त्याला विरोध करीत असल्याचे गडकरी यांनी अप्रत्यक्षपणे दाखवून दिले. या कायद्यातील सुधारणांना कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरात या राज्यांनीही विरोध दर्शविला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –