सावधान ! भारतात नसलेल्या ट्राफिक नियमांबाबत पसरवल्या जातात ‘अफवा’, मंत्री नितीन गडकरींनी सांगितलं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ट्रॅफिक संदर्भात सध्या एखादा नियम तोडला तर आता दहा पट अधिक रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे आता कोणीही ट्रॅफिकचे नियम तोडत नाही अशा प्रकारच्या अनेक अफवा सध्या सोशल मीडियावर येत आहेत. मात्र या अफवांबाबत ‘ऑफिस ऑफ नितीन गडकरी’ यावरून अधिकृतपणे एक महत्वाचे ट्विट करण्यात आले आहे. 1 सप्टेंबर 2019 पासून नवीन मोटार वाहन कायदा काही राज्यांमध्ये लागू करण्यात आला आहे. त्यामुळे याबाबत अनेक अफवा सोशल मीडियावर सुरु होत्या.

रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी याआधीही अफवांबाबत आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे ऑफिस ऑफ नितीन गडकरी यांच्या फेसबुक वरून त्या अफवांबद्दल माहिती देण्यात आली आहे ज्याला लोक ट्रॅफिकचा नियम समजत आहेत.

असे कोणतेही नियम नाहीत –
या ट्विट मध्ये त्या पाच अफवा सांगितल्या गेल्या आहेत ज्यांना लोक नियम समजत आहेत. मात्र या केवळ अफवा आहेत. या बाबत तुम्हाला कोणीही दंड आकारू शकत नाही

अर्ध्या भाईचा शर्ट घातल्याबद्दल
लुंगी बनियनवर गाडी चालवल्याबद्दल
गाडीमध्ये एक्सट्रा बल्ब ठेवला नाही तर
गाडीचा आरसा खराब असेल तर
चप्पल घालून गाडी चालवल्याबद्दल

या पाचही गोष्टींबाबत कोणतेही नियम नाहीत आणि या गोष्टीवर दंड आकारला जातो या पूर्णपणे अफवा आहेत. त्यामुळे या गोष्टींबाबत ट्रॅफिक पोलीस तुम्हाला दंड आकारू शकत नाही.

Visit : policenama.com