Nitin Gadkari | ‘कामे वेळेत आणि दर्जेदार करा, नाहितर…’, नितीन गडकरींनी भरला दम

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील माहुरगड (Mahurgad) स्कायवॉकचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आयोजित सभेत बोलताना नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले, मी कमिशनखाऊ नेत्यांपैकी नाही. त्यामुळे दिलेली काम वेळेत आणि दर्जेदारपणे करा, नाही तर परिणामांना सामोरे जाण्यास तयार रहा, असा दम त्यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना दिला.

नितीन गडकरी (Nitin Gadkari) आज सहपरिवार माहूर येथे रेणुका देवीच्या (Renuka Devi) दर्शनासाठी आले होते. त्यांच्या हस्ते नियोजित लिफ्ट व स्कायवॉकच्या कामाचे ई-भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले, जनतेचा पैसा आहे, चांगले काम झाले पाहिजे. नाहीतर नेत्याला दक्षिणा दिली, आता जमून जाईल, असे वाटत असेल तर भ्रमात राहू नका. दक्षिणा घेणाऱ्यापैकी आम्ही नाही, असे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.

यावेळी त्यांनी कोठारी ते सरसम व वारंगा रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदारास काढून टाकल्याची
घोषणा केली. माहूर गडावरील स्कायवॉकच्या 51 कोटींच्या कामाला 18 महिने कसे लागतात? काम वर्षभरात पूर्ण करा. लवकर काम पूर्ण केल्यास आपण पुन्हा रेणुका मातेच्या दर्शनाला येऊन तुमचा सत्कार करु, असेही गडकरी यांनी सांगितले.

नितीन गडकरी म्हणाले, माझा 2014 मध्ये आपघात झाला होता.
यातून बरे झाल्यानंतर माहूर गडावर परिवारासह दर्शनाला आलो होते. त्यावेळी खुर्चीवरून गडावर जावे लागले होते.
त्यावेळी कुटुंबियांनी काहीही कर पण गडावर सहज जाण्याची व्यवस्था कर, असे सांगितले होते.
आज रोप-वे च्या प्रकल्पाचे उद्घाटन करताना आनंद होत आहे.
पूर्वी नागपूर ते माहूर या प्रवासाला सात ते आठ तास लागत होते.
मात्र आज केवळ अडीच तासात रस्त्याने नागपूरहून माहूरला आल्याचे गडकरींनी सांगितले.

Web Title : Nitin Gadkari | i do not take commission says gadkari he was speaking in at mahurgad skywalk bhoomi pujan program nrp 78

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

The Kerala Story News | ‘द केरला स्टोरी’च्या शो वरून पुण्यातील एफटीआयआय मध्ये तुफान राडा; निर्माता व दिग्दर्शकही उपस्थित

Devendra Fadnavis | ‘ज्यांच्याकडे पांढरा पैसा असेल त्यांना…’, नोटबंदीवर फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं (व्हिडिओ)

ACB Trap News | 20 हजाराच्या लाच प्रकरणी कोपरगावच्या तहसीलदारासह खाजगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात