Nitin Gadkari | नितीन गडकरींची पुण्यात टोलेबाजी; म्हणाले – ‘माझ्याकडं पैशाची कमी नाही अन् मी कोणत्या अर्थमंत्र्यांकडे पैसे मागायला जात नाही’ (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील सिंहगड रस्ता उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) पुण्यात (Pune) आले होते. यावेळी पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अनेक विषयांवर त्यांच्या मिश्किल स्टाईलमध्ये टोलेबाजी केली. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे (Delhi-Mumbai Expressway) च्या बांधकामासाठी निधी पुरवण्याचा मुद्दा येताच नितीन गडकरी यांनी, ‘माझ्याकडे पैशांची कमी नाही आणि मी कोणत्या अर्थमंत्र्यांकडे (Minister Finance) पैसे मागायला जात नाही’, असा टोला लगावला.

दिल्लीला थेट नरीमन पॉइंटशी जोडून देतो

नितीन गडकरी म्हणाले, माझं वरळी-वांद्र्याशी भावनीक नातं आहे. या कामासाठी 60 ते 70 हजार कोटी लागले, तरी मी एक असा मंत्री आहे की ज्याच्याकडे पैशांची काही कमी नाही. आणि मी कोणत्या अर्थमंत्र्यांकडे पैसे मागालयालही जात नाही. त्यामुळे पैसा कसा उभा करायचा ही समस्या नाही. हाही बांधायला मी तयार आहे. फक्त याबाबत तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत (CM) चर्चा करुन धोरणात्मक काही निर्णय झाला, तर दिल्लीला नरीमन पॉईंटशी (Nariman Point) थेट थोडून देण्याचं काम मी करुन देतो, असे गडकरी म्हणाले.

… तर दिल्ली 12 तासांत
नितीन गडकरी पुढे म्हणाले, अजित दादा, मी आता दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे बांधतोय. परवा मी त्याचं काम पाहिलं. एका ठिकाणी तो 12 लेन आहे. त्यावर 170 किमी स्पीडच्या गाडीत बसलो होतो. पण पोटातलं पाणी हललं नाही. त्याचं 70 टक्के काम झालं आहे. फक्त महाराष्ट्रातलं (Maharashtra) काम राहिलं आहे. या हायवेला मी जेएनपीटी (JNPT) पर्यंत नेणार आहे. माझी इच्छा होती की वसई-विरारपासून वरळी बांद्र्यापर्यंत हा मार्ग जोडला तर नरीमन पॉईंटवरुन थेट दिल्लीला 12 तासात पोहोचता येईल, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

 

पुण्यात रिंग रोड बांधून देतो

भुसंपादन करुन दिलं तर पुण्यात रिंग रोड (Ring Road in Pune) बांधून देईन, अशी मोठी घोषणा नितीन गडकरी यांनी यावेळी केली.
पुणे-बंगळुरू (Pune-Bangalore Highway) 40 हजार कोटी रुपयांचा नवा महामार्ग बांधण्याची योजना आहे.
याशिवाय नव्या महामार्गाच्या शेजारी नवं शहर वसवायचं आहे.

जिल्ह्यात 221 किमी लांबीच्या 22 महामार्गाचा प्रकल्प
जिल्ह्यात 221 किमी लांबीच्या 22 महामार्ग प्रकल्पांचा नारळ गडकरींच्या हस्ते आज (शुक्रवार) फोडण्यात आला.
राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून जिल्ह्यात तब्बल 134 कोटी रुपयांचे रस्ते, पुलांची कामे केली जणार आहेत.

Web Titel :- Nitin Gadkari | i have no shortage money and i am not going ask any finance minister money nitin gadkari video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nitin Gadkari | नितीन गडकरींची मोठी घोषणा; म्हणाले – ‘पुणे-सातारा महामार्गावरील टोल रद्द करणार’ (व्हिडीओ)

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 174 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Share Market Today | इतिहासात पहिल्यांदा सेन्सेक्स 60,000 अंकाच्या वर बंद, निफ्टीने सुद्धा केली विक्रमी स्तरावर क्लोजिंग