Nitin Gadkari | …म्हणून नितीन गडकरी म्हणाले; ‘विहिरीत जीव देईल पण पक्ष सोडणार नाही’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Nitin Gadkari | पीएनजी सराफ पेढीच्या 190 व्या वर्धापन दिनानिमित्त सांगली येथे आयोजित एका कार्यक्रमात भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आले होते. यावेळी त्यांची मुलाखत घेण्यात आली त्यांची ही मुलाखत अभिनेते राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) यांनी घेतली. या मुलाखतीमध्ये गडकरींनी अनेक किस्से सांगितले. यातील एक खास म्हणजे माजी गृहराज्यमंत्री श्रीकांत जिचकार (Shrikant Jichkar) यांच्यासोबतचा किस्सा त्यांनी सांगितला.

 

मी भाजपमध्ये (BJP) काम करत होतो तेव्हा मी विद्यार्थी युनियनचा (Student Union) नेता होतो. लक्ष्मण मानकर हे भंडाऱ्याचे (Bhandara) खासदार होते. त्यांनी मला प्रिंटिग मटेरियल दिलं होतं. मी ते घेऊन पुण्याला (Pune) निघालो होतो. पुण्याच्या पहिल्या नंबरच्या प्लॅटफॉर्मवर आलो. तेव्हा मागून जिचकर आले त्यांनी माझ्याकडील सामान पाहिलं म्हणाले, नितीन तू हे सामान कशाला घेतो यांना दे.

 

मी म्हणालो, आमच्या पार्टीचं साहित्य आहे. तेव्हा जिचकर म्हणाले, नितीन तुला एक गोष्ट सांगू तू चांगला आहेस.
पण तुझ्या पक्षाला काही भविष्य नाही. तू पार्टी बदल. यावर मी त्यांना म्हणालो, श्रीकांत मी विहीरीत जीव देईल पण पार्टी बदलणार नाही.
त्यावर जिचकर म्हणाले, तुझ्या पक्ष्याला भविष्य नाही.
तेव्हा मी म्हणालो होतो, हरकत नाही आणि मी बाहेर आलो, हा किस्सा गडकरींनी (Nitin Gadkari) शेअर केला.

मुंबईसारखं फास्ट फूड कुठे नाही – गडकरी
दरम्यान, पहिल्यासारखं माझे फिरणं होत नाही. मुंबईसारखे फूड कुठेही नाही सध्या माझी अडचण z प्लस मुळे होतेय.
भेटणाऱ्यांची संख्या वाढल्याने वाचन कमी होतंय.
माझे वजन 93 किलो आहे. आता आधी 135 किलो होते, माझे खाणे – पिणे आवड जपतो.
मी सांगलीचा भडंग आवडीने खातो, असंही गडकरी म्हणाले.

 

Web Title :- Nitin Gadkari | i will die but never quit my party says bjp leader and union minister nitin gadkari

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा