Nitin Gadkari | खासदार क्रीडा महोत्सवात भाजपनेत्याच्या मुलाकडून झालेल्या राड्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नागपूर येथे सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवात (MP Sports Festival Nagpur) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे निकटवर्तीय असलेल्या मुन्ना यादव (Munna Yadav) यांच्या मुलाने खासदार क्रीडा महोत्सवात क्रिकेटची मॅच सुरू असताना राडा घातला. त्याने यादरम्यान पंच तसेच सामन्याच्या आयोजकांना मारहान केली. याबाबत आज पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सावध भूमिका घेतली. जी घटना घडली ती अतिशय वाईट होती. परत अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घेऊ. असे यावेळी बोलताना नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

याप्रकरणावर खासदार क्रीडा महोत्सव संयोजक संदीप जोशी यांना विचारले असता ते म्हणाले, ‘मुन्ना यादव यांचा मुलगा करण यादव यांनी केलेल्या मारहाणीची आम्ही दखल घेतलेली असून, आम्ही चौकशी करणार आहोत. त्याचा अहवाल वरिष्ठांना देणार आहोत. त्यानंतर कारवाई करण्यात येईल.’ अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली.

जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण :
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या संकल्पनेतून नागपूर येथे खासदार क्रीडा महोत्सव सुरू आहे. यावेळी मुन्ना यादव यांच्या मुलांनी क्रिकेट सामना सुरु असताना पंचांसोबत वाद घालून त्यांना मारहाण केली होती. या सोबतच सामन्याच्या आयोजकांनाही मारहाण केली होती. या संदर्भात पंचांनी खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी यांच्याकडेही तक्रार केली होती. मात्र त्यावर कुठलीही कारवाई झाली नसल्याने पंचांनी अखेर पोलिसांकडे धाव घेतली. मात्र माध्यमांमध्ये प्रकरण गाजल्यानंतर संयोजकांनी सावध भूमिका घेत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला आहे.

सूत्रांकडून हाती आलेल्या माहितीनुसार, छत्रपती चौकात खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत खामला इलेव्हन आणि
स्टार इलेव्हन या दोन संघामध्ये सामना होता. यातील एका संघात मुन्ना यादव यांचा मुलगा अर्जुन आणि करन
हे दोघेही खेळत होते. सामना सुरु असताना अर्जुनने थ्रो बॉलच्या मुद्द्यावरुन पंचांशी वाद घालायला सुरुवात केली.
पंचांनी त्याला समजावून सांगूनही तो ऐकायला तयार नव्हता.
अर्जुनने रागाच्या भरात ग्राऊंडवरच गोंधळ घालायला सुरुवात केली.
तरीही पंचांनी हा निर्णय मागे घेण्यास नकार दिल्याने त्याने भर मैदानात प्रेक्षकांसमोरच पंचांना आणि आयोजकांना
मारहाण केली. इतकेच नव्हे तर यादव यांच्या समर्थकांनी वाद थांबविण्यापेक्षा अर्जुन यादवला साथ देत
मैदानात गोंधळ घातला होता.

Web Title :- Nitin Gadkari | incident happned by munna yadav son in khasdar krida mahotsav nagpur was bad we will take care in future

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chhagan Bhujbal | सत्यजीत तांबे यांना भाजपचा पाठिंबा मिळेलही, पण त्यांच्यामुळे बाळासाहेब थोरात अडचणीत आले – छगन भुजबळ…

Bhaskar Jadhav | ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचे निवडणूक आयोगावर ताशेरे; म्हणाले…