पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींपेक्षा ‘हा’ नेता उत्तम : अनुराग कश्यप

प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपचे ट्वीट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपने एक ट्वीट करून पंतप्रधान पदाबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.

नितीन गडकरी हे पंतप्रधानपदाकरता उत्तम नेते आहेत. असं मत त्याने ट्विट करून व्यक्त केले आहे. देशाच्या पंतप्रधान पदासाठी एनडीएकडून नरेंद्र मोदींचे नेतृत्व पुढे केले असले तरी नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा वारंवार केली जात होती. त्यानंतर आता या दिग्दर्शकाने आज हे ट्वीट केले आहे.

नितीन गडकरी यांच्या विकासकामांची अनेकांनी स्तूती केली आहे. काही दिवसांपूर्वी विरोधकांनीही स्तूती केली होती. सोनिया गांधी आणि मल्लिकार्जून खरगे यांनी देखील त्यांच्या कामांची स्तूती केली आहे. त्यात आता अनुराग कश्य़पची भर पडली आहे.

नरेंद्र मोदी यांना पाठींबा देणाऱ्या ट्वीटला रिट्विट करत अनुराग कश्यप म्हणतो, भारतीय जनता पक्षात नरेंद्र मोदींपेक्षा गडकरी हे पंतप्रधान पदासाठी उत्तम पर्याय आहेत. सर्वच पक्षांमध्ये भ्रष्टाचार आहे. परंतु त्याचे स्वरुप बदलले आहे. परंतु कम्यूनलिजम, द्वेष आणि भितीचे राजकारण ही गोष्ट तुम्ही दूर करू शकता.

काही दिवसांपूर्वीच मोदी विरोधक आणि मोदी समर्थक कलाकारांचे गट पडले आहेत. त्यात ६०० कलाकारांनी मोदींना किंवा त्यांच्या मित्रपक्षांना मत न देण्याची मागणी केली आहे. तर ९०७ कलाकारांनी मोदींच्या समर्थनार्थ एकत्र येऊन त्यांना मत देण्याची मागणी केली आहे.

Loading...
You might also like