Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आरक्षणाबाबत मोठं विधान, म्हणाले…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Nitin Gadkari | सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन अनेक चर्चा रंगल्या आहेत. यातच आरक्षणाच्या (Reservations) विषयावरुन अनेक आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आरक्षणाबाबत एक मोठं विधान केलं आहे. त्यावेळी गडकरी हे आज (शनिवारी) नागपुरात बोलत होते.

 

नागपूर येथे वनराई फाऊंडेशनच्या (vanrai foundation) वतीने कमानी ट्युब्जच्या अध्यक्षा पद्मश्री कल्पना सरोज (Kalpana Saroj) यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, वनराई फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. गिरीश गांधी (Dr. Girish Gandhi) तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ. सरोज यांच्यासारख्या यशस्वी उद्योजिकेने दलित समाजातील 100 तरुणींना उद्योजक म्हणून घडवावे. अशा प्रकारच्या प्रयत्नांतूनच आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित होईल, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.

 

त्यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, आपल्या देशात ज्याला त्याला नोकरी हवी असते. चौकटीबाहेरचा विचार कुणी करत नाही आणि समजून घेत नाही. मुळात सरकारी नोकर्‍याच नाही तर त्यात आरक्षण कुठून देणार? आरक्षण हा केवळ राजकारणाचा विषय झाला आहे. आपल्याकडच्या राजकारण्यांची दृष्टीच वेगळी आहे. मागास असणे ही पूर्णपणे राजकीय बाब झाली आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

तंत्रज्ञानामुळे रोजगार आणि पैसा मिळतो. येणारा काळा हा ड्रोन तंत्रज्ञानाचा आहे आणि त्यामुळे आपले जगणे बदलणार आहे.
तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करणारा उद्योजक बनू शकतो आणि त्याचा कोणत्याही जात, पंथ, धर्म, भाषेशी संबंध नाही.
व्यक्तीच्या चांगुलपणाचा आणि गुणवत्तेचा कशाशी संबंध नाही. आपल्याकडे विविध विषय शिकवणारी महाविद्यालये आहेत.
पण, उद्योजकता शिकवणार्‍या संस्था नाहीत. ज्याला बघावे त्याला, शाळा किंवा कॉलेज हवे हसते.
दुसरा व्यवसाय करण्याची तयारी नसते,’ अशी खंत देखील गडकरी यांनी व्यक्त केली आहे.

 

Web Title :- Nitin Gadkari | issue of reservation is just the part of politics says bjp leader nitin gadkari

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar | ‘जिथं भाजपची सत्ता नाही तिथल्या सरकारला केंद्र सरकार टार्गेट करतंय’ – शरद पवार

Girish Mahajan | काय सांगता ! होय, माजी मंत्री गिरीश महाजनांनी चक्क सिनेमा निर्मात्याकडे केली ‘ही’ मागणी; म्हणाले – ‘अजितदादा, जयंत पाटील….’

Ananya Pandey | अनन्या पांडे लग्न करतेय? हातामध्ये हिरवा चुडा? सोशल मीडिया वरती फोटोज झपाट्याने व्हायरल.