सरकारनं लॉन्च केलं शेणापासून बनलेलं साबण अन् बांबूच्या बाटल्या, इथून खरेदी करू शकता, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात प्लास्टिकच्या बाटल्याऐवजी लवकरच बांबूच्या बाटल्या बाजारात येणार आहेत. खादी व ग्रामोद्योग आयोगाने गांधी जयंतीच्या आधी (2 ऑक्टोबर) ही बांबूची बाटली बाजारात आणली आहे. याशिवाय सोलर टेक्सटाईल कापड (सोलर स्पिनिंग व्हीलपासून बनविलेले), शेणाचा साबण आणि शैम्पू, कच्च्या घाणीचे मोहरीचे तेल यासह बरीच उत्पादने बाजारात आली आहेत. देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी खादी उत्पादनांना मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. यासह, खादी ग्रामोद्योग आयोग आता मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे सरकारने जाहीर केले.

चला जाणून घेऊयात शेणाच्या साबणाबद्दल….

खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखतीत सांगितले की बांबूच्या बाटलीची क्षमता प्लास्टिकच्या १ लिटरच्या बाटलीच्या तुलनेत कमीत कमी ७५० एमएल इतकी असणार आहे. या बाटलीची प्रारंभिक किंमत ३०० रुपये निश्चित केली आहे. ही बाटली पर्यावरणास अनुकूल तसेच टिकाऊ देखील आहे.

तसेच खादी ग्रामोद्योगाने गोमूत्र आणि शेणापासून साबण देखील बनविला आहे. यावर विनय कुमार सक्सेना असे म्हणतात की तो सर्व चाचण्यांमध्ये यशस्वी झाला असून त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. याशिवाय खादी ग्रामोद्योगच्या सर्व स्टोअरमध्ये बरीच उत्पादने मोठ्या सवलतीत उपलब्ध आहेत. बांबूच्या पाण्याच्या बाटलीची किंमत ५६० रुपये आहे आणि साबणाच्या १२५ ग्रॅमची किंमत १२५ रुपये आहे.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी शेण आणि गोमुरपासून बनलेला साबण आणि बांबूच्या बनवलेल्या पाण्याच्या बाटल्या सादर केल्या. खादी व ग्रामोद्योग आयोगाने ही उत्पादने तयार केली आहेत.

मंगळवारी गांधी जयंतीनिमित्त असलेल्या या कार्यक्रमात गडकरी म्हणाले की ते सेंद्रिय शेती आणि त्याचे फायदे यांचे मोठे समर्थक आहेत. रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचीही जबाबदारी असलेल्या गडकरी यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निर्यात युनिटला राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध करण्यास सांगितले आहे. ते म्हणाले की मंत्रालयाने एक योजना प्रस्तावित केली आहे ज्या अंतर्गत अशा प्रकारच्या एमएसएमई युनिटमध्ये १० टक्के इक्विटी सहभाग केंद्र सरकारकडे असेल.

यावेळी गडकरींनी असेही स्पष्ट केले की खादी व ग्रामोद्योग आयोगाने येत्या दोन वर्षांत १०,००० कोटींची उलाढाल करुन विशेषत: ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण केला पाहिजे.

Visit : Policenama.com