Nitin Gadkari | राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – भगतसिंग कोश्यारींच्या (Governor Bhagat Singh Koshyari) शिवाजी महाराजांबद्दलच्या (Shivaji Maharaj) वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण भलतेच तापले आहे. भाजप (BJP) सोडता समाजातील सर्व स्तरातून त्यांनी केलेल्या वक्तव्यावर टीका होत आहे. भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांना जुने आदर्श म्हणत बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar), नितीन गडकरींसारख्या (Nitin Gadkari) नवीन व्यक्तींचा आदर्श घ्यायला हवा असे वक्तव्य केले होते. त्यावर आता खुद्द नितीन गडकरींची (Nitin Gadkari) प्रतिक्रिया आलेली आहे. त्यांच्या कार्यालयाने एक विडिओ ट्विट केला आहे. त्यात ते शिवाजी महाराजांबद्दल बोलताना दिसतात.

 

“जेव्हा आम्ही शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला आमच्या आवडत्या नेत्याबद्दल विचारात असत? मग काही मुलं सुभाषचंद्र बोस (Subhashchandra Bose) यांचे नाव घ्यायचे काही नेहरूंचे (Jawaharlal Nehru) नाव घ्यायचे, काही गांधीचे (Mahatma Gandhi) नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत (Nitin Gadkari) सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असे भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना शनिवारी (१९ नोव्हेंबर) मराठवाडा विद्यापीठाकडून मानद डि. लिट पदवी देण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कुलपती म्हणून उपस्थित असताना, त्यांनी हे वक्तव्य केले.

या मुद्द्यावर वाद वाढताना बघून नितीन गडकरींनी त्यांच्या ट्विटर (Twitter) खात्यावरून (Office Of Nitin Gadkari) एक ३० सेकंदाचा व्हिडीओ जरी केला आहे.
या व्हिडिओत ते भावनिक होऊन शिवाजी महाराजांबद्दल बोलत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे हो! आमच्या आई-वडिलांपेक्षाही छत्रपती शिवाजी महाराजांवर आमची निष्ठा आहे. कारण त्यांचं जीवन आमचं आदर्श आहे.
कीर्तिवंत! वरदवंत! सामर्थ्यवंत! जाणता राजा!! निश्चयाचा महामेरु ! बहुत जनासी आधारू ! अखंडस्थितीचा निर्धारु ! श्रीमंत योगी !! डीएड-बीएड करणारा राजा नव्हता,
वेळ पडली तर आपल्या मुलालाही कठोर शिक्षा देणारा राजा होता.” असे ते या व्हिडिओमध्ये बोलताना आहेत.
तर “छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत,” असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे.

 

Web Title :- Nitin Gadkari | maharashtra governor bhagat singh koshyari controversial statement on chatrapati shivaji maharaj nitin gadkari first comment

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Supriya Sule | ‘पत्रकार मुली साड्या का नाही नेसत?’ विधानावर सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण

Sanjay Raut | राहुल गांधींचा संजय राऊतांना फोन; शिवसेना खासदार म्हणाले – ‘हा ओलावा संपला आहे. यात्रेत तो दिसतोय…’

Kangana Ranaut On Tabu – Drishyam 2 | ‘दृश्यम 2’मधील तब्बूविषयी कंगनाचं मोठं वक्तव्य; पोस्ट व्हायरल