Nitin Gadkari | कारमधील प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी नितीन गडकरींचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Nitin Gadkari | केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज (शुक्रवारी) एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कारने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतला आहे. आठ आसन क्षमतेच्या सर्व कारमध्ये कमीत कमी सहा एअरबॅग्स (Six Airbags) उपलब्ध करून देणे कार उत्पादक कंपनीसाठी बंधनकारक असणार आहे. अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.

 

नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी याबाबत माहिती ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे. यानुसार 8 आसन क्षमतेच्या सर्व कारमध्ये कमीतकमी 6 एअरबॅग्स उपलब्ध करून देणे कार उत्पादक कंपनी साठी बंधनकारक असेल. याबाबतच्या जीएसआर अधिसूचनेचा मसुदा आज मी मंजूर केला आहे’, या निर्णयामुळे निश्चितपणे कारचा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात प्राणहानी टळणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

यापुर्वी 1 जुलै 2019 पासून त्यांनी कारमध्ये चालकासाठी एअरबॅग बंधनकारक केली होती.
नंतर 1 जानेवारी 2022 पासून चालकाच्या बाजूच्या सीटसाठीही एअरबॅग बंधणकारक केली.
यानंतर आता आठ आसनी सर्व कारबाबात मोठा निर्णय नितीन गडकरी यांनी घेतला आहे.
8 आसनी सर्व कारमध्ये 6 एअरबॅग्जची (Six Airbags) व्यवस्था अनिवार्य केली आहे.
यामुळे प्रामुख्याने समोरासमोर वाहनांची धडक होऊन जे अपघात होतात त्यात जीवितहानी टाळता येणार आहे.

 

दरम्यान, कारमध्ये 6 एअरबॅग्ज लावणे अनिवार्य झाल्याने कारच्या किंमतीही वाढणार आहे.
सध्या 2 एअरबॅग्ज बंधनकारक होत्या. आता त्यात आणखी 4 एअरबॅग्जची वाढ झाल्याने त्यासाठी साधारण 8 ते 9 हजार रुपये जादा खर्च अपेक्षित आहे.
एका एअरबॅगसाठी साधारण 1800 रुपये लागतात आणि स्ट्रक्चरमध्ये त्यानुसार बदल करण्यासाठी पाचशे रुपये खर्च येईल.
त्यात डिवाइस आणि लेबर कॉस्टही लागणार आहे. त्यामुळे एकूण 30,000 रुपये जादा द्यावे लागणार असल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे.

 

Web Title :- Nitin Gadkari | minimum 6 airbags mandatory in vehicles for up to 8 passengers says bjp leader and union minister nitin gadkari

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढला ! गेल्या 24 तासात 43, 211 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

CDS Bipin Rawat | बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात नेमका कशामुळे झाला? एअरफोर्सच्या चौकशी समितीने दिली माहिती

 

7th Pay Commission | मोदी सरकार किमान मूळ पगार 18,000 वरून वाढवून करणार 26,000 रुपये, लवकरच होऊ शकते घोषणा