Homeताज्या बातम्याNitin Gadkari | '60 किलोमीटरमध्ये एकच टोल प्लाझा, स्थानिकांना मिळणार पास'; केंद्रीय...

Nitin Gadkari | ’60 किलोमीटरमध्ये एकच टोल प्लाझा, स्थानिकांना मिळणार पास’; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Nitin Gadkari | देशातील राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास पुढील काळामध्ये स्वस्त होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्या दृष्टीकोनातून सरकारने आराखडा देखील तयार केला आहे. ठराविक अंतराच्या मर्यादेत एकदाच टोल वसूल करण्यात येणार आहे. टोल प्लाझाजवळ राहणाऱ्या आणि महामार्गावरून वारंवार प्रवास करणाऱ्या स्थानिकांना दिलासा देण्यासाठी त्यांना पास देण्याची योजना आखण्यात आलीय. याबाबत माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली.

आज (मंगळवारी) लोकसभेत बोलताना नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितलं की, ‘आता महामार्गावरील टोलनाक्यांची संख्या मर्यादित असेल.
त्याचबरोबर, स्थानिकांना आता टोल भरावा लागणार नाही. सरकारची ही योजना आगामी तीन महिन्यांत लागू होणार आहे.’ सरकार येत्या तीन महिन्यांत देशातील टोलनाक्‍यांची संख्या कमी करणार आहे आणि 60 किलोमीटरच्या परिघात फक्त एकच टोल प्लाझा कार्यरत असेल. 60 किमीच्या परिघात येणारे इतर टोलनाके येत्या 3 महिन्यांत बंद केले जातील. अशी माहिती गडकरी यांनी दिली आहे.

दरम्यान, टोल प्लाझाजवळ राहणाऱ्यांना टोल भरावा लागणार नाही. त्यांना पास दिला जाईल.
यामुळं महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला दिलासा तर मिळेलच;
परंतु, अधिकाधिक लोक टोल भरून महामार्गावरून प्रवास करण्यास प्रवृत्त होतील.
दरम्यान, वास्तविक, महामार्गावरील वाहतूक वाढवून टोलचे उत्पन्न वाढवण्यावर सरकारचा भर आहे.
तसेच, टोलनाक्यांजवळ राहणाऱ्यांची नेहमीच मागणी असते की, त्यांना टोलमध्ये सवलत द्यावी.
कारण, स्थानिक असल्याने त्यांना सतत प्रवास करावा लागतो. त्यामुळे केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने याबाबत निर्णय घेतला आहे.

 

 

Web Title :- Nitin Gadkari | modi government plans to remove more than one toll plaza in sixty km distance says nitin gadkari

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Malaika Arora Bold Photo | मलाइका अरोरानं फक्त कोट घालून शेअर केला फोटो, व्हायरल फोटो पाहून नेटकऱ्यांच्या हृद्याचे वाढले ठोके

 

Alia Bhatt Oops Moment | आलिया भट्ट झाली Oops Moment ची शिकार, खूर्चीवर बसत असतानाच…

 

Ananya Panday Glamrous Look | अनन्या पांडेनं काळ्या रंगाचा पारदर्शक ड्रेस घालून दिल्या हॉट पोज, मादक फोटो पाहून नेटकरी झाले घायाळ

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News