Nitin Gadkari | फडणवीस यांच्याबद्दल वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्यावर नितीन गडकरींचा खुलासा, म्हणाले…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबाबत मी राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना कधीही, कोणतीही गोष्ट गुपचूप सांगितलेली नाही. वडेट्टीवारांनी अशी वक्तव्ये करुन बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करु नये, असा टोला केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी लगावला आहे. विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत खुलासा केला आहे.

नितीन गडकरी म्हणाले, वडेट्टीवारांच्या भाषणाची क्लिप पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांचे वक्तव्य पूर्णत: निराधार, खोटे आणि बेजबाबदारपणाचे आहे. फडणवीस हे माझ्यासाठी धाकट्या भावासारखे (younger brother) आहेत. शिवाय, ते माझ्या पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत. एकमेकांच्या विरोधात काड्या करणे आणि एकमकांची जिरवणे ही काँग्रेसची (Congress) परंपरा आहे. त्यामुळे अशा प्रकारचा संभ्रम काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार आमच्याही बाबतीत निर्माण करु पाहतात, असे गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटले.

‘जा सिमरन जा जिले अपनी जिंदगी’ काजलने पोस्ट केला व्हिडीओ ; DDLJ ला आज पूर्ण झाले 26 वर्ष.

काँग्रेसमध्ये नैराश्य आहे

फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या (CM) काळात महाराष्ट्राची प्रगती झाली.
विरोधी पक्षनेते म्हणूनही ते उत्तम काम करत आहेत.
सरकारच्या चुकांवर नेमकं बोट ठेवून ते लोकशाहीतील विरोधकांचे कर्तव्य निभावत आहेत.
सरकार तीन पक्षांचे असले तरी काँग्रेसमध्ये नैराश्य आहे. त्यांना कुणीही मोजत नाही.
त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी वडेट्टीवार यांच्यासारखे काँग्रेसी नेते अशा प्रकारची वक्तव्ये करुन गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असा टोला नितीन गडकरी यांनी लगावला.

काय म्हणाले वडेट्टीवार ?

नागपूरवाल्यांना (Nagpur) माहित आहे. तिकडे भाजपमध्ये दोन टोके आहेत.
एकीकडे देवेंद्र फडणवीस तर दुसरीकडे नितीन गडकरी, दोघांची तोंडं विरुद्ध दिशेला आहेत.
दोघांमध्ये 36 चा आकडा आहे. म्हणून गडकरींनी कानामध्ये गुपचूप सांगितले की, फडणवीसांची जिरवायची होती.
तशी ती जिरली. आता पुन्हा जिरवायचीय.
पण कुणाची जिरेल ते कळेल.
मात्र मी सांगतो पुढचं केंद्रातील सरकार (Central Government) मात्र बदलणार आहे.

हे देखील वाचा

Pune Railway Station | दिवाळीत प्रवाशांना पुणे रेल्वे स्टेशनवर येणे पडणार ‘महागात’; रेल्वे प्रशासनाचा नवा नियम

Quickly Earn Money | 10 हजार रूपये लावून सुरू करू शकता ‘हा’ व्यवसाय, दरमहा होईल 1 लाखापेक्षा जास्त कमाई; जाणून घ्या कशी?

Dr. Amol Kolhe In PCMC | खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या ‘एन्ट्री’नंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक ‘अ‍ॅक्शन’मध्ये

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Nitin Gadkari | nagpur bjp leader nitin gadkari slams vijay wadettiwar says devendra fadnavis is like my younger brother

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update