Nitin Gadkari | पश्चिम बंगालमधील कार्यक्रमात नितीन गडकरींना भोवळ

कोलकत्ता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगाल येथील एका कार्यक्रमात भाषण देताना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना भोवळ आली आणि ते खाली पडता पडता वाचले. यावेळी ताबडतोब प्राथमिक उपचार पथक कार्यक्रमस्थळी पाचारण करण्यात आले त्यांनी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यावर प्रथमोपचार केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज (दि. 17) पश्चिम बंगालमधील सिलिगुडीतील दागापूर येथे एका जाहीर कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी अजानक त्यांची तब्येत बिघडली. भाषण सुरू असताना, अचानक त्यांना भोवळ आली. यानंतर तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचे पथक पोचले आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. पश्चिम बंगाल येथील सिलिगुडीमधील विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. गडकरींची तब्येत बिघडल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती ठीक आहे.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, गडकरींच्या शरीरातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे त्यांना त्रास झाला
असल्याची शक्यता आहे. मात्र, त्यांची प्रकृती आता उत्तम असून तेथील अन्य कार्यक्रमांत आणि बैठकीत ते
सहभागी होणार असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. यापूर्वी 2018 मध्ये देखील महाराष्ट्रात
अहमदनगर येथील एका कार्यक्रमात गडकरी यांची व्यासपीठावर तब्येत बिघडली होती आणि ते भोवळ येऊन खाली पडले होते. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Web Title :- Nitin Gadkari | nitin gadkari felt dizzy during a program in west bengal
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Janhvi Kapoor | जान्हवी कपूरने सोडली सगळी लाज, कॅमेऱ्यात कैद झाले ‘या’ अवस्थेतील फोटो