Nitin Gadkari | ‘त्या’ बातमीवरुन नितीन गडकरी संतापले, म्हणाले-‘मीडियाने जबाबदारीने…’

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – तुम्हाला योग्य वाटत असेल तर मला मत द्या, नाहीतर नका देऊ असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मध्यंतरी केले होते. यावरुन नितीन गडकरी (Nitin Gadkari) राजकारणातून निवृत्त होणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. मात्र यावर आता गडकरी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणातून निवृत्त होण्याचा कुठलाही विचार नाही, मीडियाने जबाबदारीने बातम्या द्याव्यात, असे गडकरी म्हणाले. मुंबई गोवा महामार्गाच्या (Mumbai Goa Highway) पळस्पे ते कासु या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भुमीपुजन गडकरी यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले होते नितीन गडकरी?
नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले, विकास कामाशिवाय गडकरींच्या वक्तव्यांची चर्चाही नेहमीच होत असते. आता नागपूरमधील एका खासगी संस्थेच्या कार्यक्रमात त्यांनी बेधकड वक्तव्य केलं. जर तुम्हाला योग्य वाटलं तर मला मत द्या, नाहीतर नका देऊ. आता जास्त लोणी लावायला मी तयार नाही. तुम्हाला योग्य वाटलं तर ठीक, नाहीतर कोणी दुसरा येईल, असं गडकरी म्हणाले होते.
नितीन गडकरींची अशी वक्तव्ये नवी नाहीत. त्यांनी यापूर्वी देखील अशा प्रकारची वक्तव्ये केली होती.
त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्यांची राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा होत असते.
पण जेव्हा गडकरी असे बोलतात त्यावेळी राजकीय विश्लेषकांकडून वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जातात.
नितीन गडकरी नाराज आहेत किंवा पक्ष गडकरींबाबत कठोर आहे अशा प्रकारची चर्चा सुरु होते.
Web Title :- Nitin Gadkari Nitin Gadkari got angry on ‘that’ news, said – ‘Media responsibly…’
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime News | जुन्या कात्रज घाट रोडवरील हॉटेल तोरणाजवळ युवकाच्या खुनाचा प्रयत्न