Nitin Gadkari | ‘देशात ई-महामार्ग आणि ई-ट्रक आणण्याचा देखील आमचा संकल्प’ – नितीन गडकरी

Nitin Gadkari | nitin gadkari news e truck will be launched next month says minister nitin gadkari
file photo

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील परिवहन क्षेत्रात मोठे बदल करण्याचा निर्णय केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी घेतला आहे. देशात ई-महामार्ग (E-Highway) तयार करण्याचा आणि पुढील वर्षी ई-बस प्रमाणे ई-ट्रक (E-Truck) आणण्याचा देखील आमचा संकल्प आहे, असे नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले.

नितीन गडकरी मुंबईत आयआयटी (IIT) कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. देशातील सार्वजनिक वाहतूक वाढली पाहिजे. सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य दिले पाहिजे. आम्हाला देशातून पेट्रोल आणि डिझेलला हद्दपार करायचे आहे. त्यासाठी आम्ही इलेक्ट्रिक गाड्यांवर (Electric Vehicle) भर देत आहोत. इंधन तुटवडा ही आजच्या घडीला देशातील सर्वात मोठी समस्या आहे, असे गडकरी म्हणाले.

तसेच मुंबईतील आयआयटी आणि इतर विद्यार्थ्यांमध्ये मोठा फरक आहे. मुंबईतील विद्यार्थी संशोधनावर भर देतात. आपल्या देशात प्रमुख शहरांत मेट्रो (Metro) आहे. आपल्याकडील मेट्रोच्या दोन खांबामध्ये 30 मीटर अंतर आहे, तर मलेशियासारख्या देशात हे अंतर 102 मीटर आहे. फायबर स्टीलचा वापर तिथे जास्त केला जातो. त्याचमुळे प्रकल्पाची किंमत कमी होते. हे तंत्रज्ञान आपल्याकडे आले पाहिजे. मुंबईत हवेत चालणारी डबल डेकर बस असायला हवी. त्यामुळे सर्वांचा वेळ वाचू शकतो. तसेच वाहतूक कोंडीवर (Traffic Jam) देखील त्याचा चांगला परिणाम घडू शकतो, असे देखील गडकरी (Nitin Gadkari) यावेळी म्हणाले.

तसेच यावेळी त्यांनी दिल्ली आणि तेथील राजकारण्यांवर भाष्य केले. मला दिल्लीची काळजी वाटते.
दिल्लीतील पाणी चांगले नाही. दिल्लीत खूप मेहनतीने काम करावे लागेल.
दिल्लीत ज्या नेत्यांना मी मोठे नेते समजायचो ते सर्व मोठे नेते नव्हते.
तर ज्यांना मी छोटे नेते समजत होतो, ते सर्व मोठे नेते निघाले.
आपल्या देशात कोणत्या गोष्टी आयात होतात, त्यांच्यावर अभ्यास करा आणि त्याला पर्याय शोधा.
त्यावर संशोधन केले तर त्याचा देशाला फायदा होईल, असे यावेळी गडकरी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले.

Web Title :-  Nitin Gadkari | nitin gadkari news e truck will be launched next month says minister nitin gadkari

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | ‘मी सर्वांनाच कामाला लावले, काही लोक शेतकऱ्यांच्या बांधावर…’ – मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Rohit Pawar | रोहित पवारांचे तानाजी सावंत आणि राम शिंदे यांना आव्हान

Tata Airbus | टाटा एअरबस प्रकल्पावरून सत्ताधार्‍यांचीच विरोधकांना धमकी, ‘या’ नेत्यांची नार्को टेस्ट करा, सर्व गुपिते समोर येतील

Total
0
Shares
Related Posts
Maharashtra Assembly Election 2024 | sanjeevraje naik nimbalkar and deepak chavan join sharad pawar group ramraje nimbalkar not campaign for mahayuti

Maharashtra Assembly Election 2024 | फलटणच्या राजकारणात मोठ्या घडामोडी ! संजीवराजेंसह आमदार दीपक चव्हाण शरद पवार गटात प्रवेश करणार; रामराजेंचा मात्र वेगळा निर्णय; म्हणाले – ‘भाजपच्या विचारसरणीशी भांडण नाही पण …’