Nitin Gadkari | नितिन गडकरींनी अनेक वर्षे पत्नीपासून लपवले हे मोठे गुपित, रस्त्यासाठी पाडले होते सासर्‍याचे घर

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी गुरुवारी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वेच्या कामाची पाहणी केली. गडकरी (Nitin Gadkari) यांनी हरियाणाच्या सोहनामध्ये एका कार्यक्रमाला संबोधित केले. आपल्या भाषणात गडकरी यांनी आपले अनुभव तिथे उपस्थित अभियंते आणि पत्रकारांना सांगितले. यावेळी त्यांनी तो किस्सा सुद्धा ऐकवला जेव्हा त्यांनी त्यांच्याच सासर्‍याचे घर रस्ता निर्मिती योजनेत अडथळा येत असल्याने बुलडोजर लावून पाडले होते.

सासर्‍याच्या घरावर बुलडोजर चालवला

नितिन गडकरी यांनी केंद्रीय मंत्री राव इंद्रजीत सिंह यांचे कौतूक करत आपला किस्सा ऐकवला आणि म्हणाले, तुम्ही जे केले ते मी सुद्धा केले आहे. जेव्हा माझे नवीन-नवीन लग्न झाले होते तेव्हा माझ्या सासर्‍यांचे घर रस्त्याच्या मधोमध येत होते. उघड आहे की ही मोठी समस्या होती. वाहतुक सुरळीत होत नव्हती. यामुळे मी पत्नीला न सांगताच सासर्‍याच्या घरावर बुलडोजर चालवला आणि रस्त्याचे काम पूर्ण केले. यानंतर सामान्य जनतेचे येणे-जाणे सुलभ झाले.

Gold Price Today | खुशखबर ! 5 महिन्यामधील सर्वात स्वस्त मिळतंय सोने, विक्रमी किमतीपासून 10 हजार रुपयांनी कमी झाला दर

चांगल्या सेवेसाठी, पैसे द्या

गडकरी पुढे म्हणाले, मला अधिकारी सांगत होते की, तुमचे (राव इंद्रजीत सिंह) सुद्धा, वहिनींचे घर रस्त्यामध्ये येत होते तेव्हा तुम्ही म्हटले की ते तोडावे लागेल आणि जागा रिकामी करावी लागेल, नेत्याने हेच केले पाहिजे. अतिक्रमण वाचवण्याचे पाप करू नये.

टोल टॅक्सच्या बाबतीत गडकरी म्हणाले, जर तुम्हाला चांगली सेवा पाहिजे तर त्यासाठी पैसे सुद्धा द्यावे लागतील. एसी हॉलमध्ये कार्यक्रम करायचा असेल तर पैसे द्यावे लागतील. मोफत करायचे असेल तर उघड्या मैदानावर सुद्धा विवाह होऊ शकतो.

आम्ही 15 लाख कोटी कोटीचा रस्ता बनवत आहोत

नितिन गडकरी म्हणाले, आमच्या मंत्रालयाचे बजेट एक लाख कोटी रुपयांचे आहे, परंतु आम्ही 15 लाख कोटींचा रस्ता बनवत आहोत.
जर आम्ही इन्व्हेस्टर्सकडून पैसे घेतो तर त्यांना परतही करावे लागतात.
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वे वर गुरुग्रामच्या जवळपास दोन-तीन स्मार्ट सिटी बनवता येऊ शकतात.
कोणत्याही देशाचे रस्ते चांगले असणे आवश्यक आहे. धौलाकुआं जवळ एक पोलीस स्टेशन आहे, ते हटवून सुद्धा रस्ता रूंद करता येऊ शकतो.

Pune Crime | भावकीच्या वादातून पुतण्याकडून चुलत्यावर कुऱ्हाडीने हल्ला; शिरूर तालुक्यातील घटना

रस्ते शेतकर्‍यांना श्रीमंत बनवतात

गुरुवारी एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले, मला वाटते की शेतकर्‍याने श्रीमंत व्हावे.
मी माझ्या ऑफिसमध्ये लिहिले आहे की अमेरिकेचे रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे.
हे केनेडी यांनी म्हटले होते की, रस्त्यांमुळे भरभराट येते, विकास होतो.

दिल्ली-मुंबई एक्सप्रेससाठी 95 हजार कोटी खर्च

रोड तयार झाल्यानंतर जमिनीच्या किंमती वाढतात. मी शेतकर्‍यांना बाजार भावापेक्षा दिडपट पैसे दिले आहेत. गडकरी म्हणाले, दिल्ली-मुंबई एक्सप्रेसच्या निर्मितीसाठी 95 हजार कोटी रुपयांच्या जवळपास खर्च येणार आहे. एक्सप्रेस वेच्या वैशिष्ट्यांबाबत ते म्हणाले, 21 किलोमीटर सिक्स लँड ग्रीन फील्ड मार्ग जेवर एयरपोर्टसाठी सुद्धा बनवला जात आहे. हरियाणात 6 ठिकाणी रस्त्याच्या कडेला लोकांना जन सुविधा मिळतील.

हे देखील वाचा

Pune Journalist Arrest | व्यावसायिकाकडे 5 लाखांची खंडणी मागणार्‍या पत्रकार अर्जुन शिरसाठ याला अटक; यापूर्वीही उकळली होती पाच लाखांची खंडणी, फोनवरील संभाषणातून उघड

MLA Ashutosh Kale | शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी NCP चे आमदार आशुतोष काळे यांची नियुक्ती

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Nitin Gadkari | nitin gadkari reveals big secret i bulldozered my father in law s house without informing wife

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update