Nitin Gadkari | वाहनचालकांना दिलासा ! नितीन गडकरी म्हणाले – ‘ड्रायव्हिंग करताना फोनवर बोलणं ठरणार कायदेशीर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Nitin Gadkari | भारतीय वाहन चालकांसाठी (Drivers) अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. अलीकडेच वाहतुकीच्या नियमात बदल करण्यात आला. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे चालकांना दंडाची शिक्षा करावी लागते. विशेष म्हणजे दंडाच्या रकमेत वाढही करण्यात आलीय. गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलणं कायद्याने गुन्हा आहे. मात्र या नियमाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. (Nitin Gadkari)

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. ”गाडी चालवताना फोनवर बोलणं आता गुन्हा ठरणार नाही, परंतु त्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. लवकरच याविषयीची घोषणा लोकसभेत केली जाईल,” असं देखील नितिन गडकरी यांनी सांगितलं आहे.

 

”गाडी चालवताना तुम्ही फोनवर बोलू शकता, परंतु बोलत असताना फोन तुमच्या हातात नसावा. हॅण्ड्सफ्री उपकरण (उदा. Earphones, Bluetooth इत्यादी) वापरून तुम्ही फोनवर बोलू शकता. फोनवर बोलताना तुमचा मोबाईल तुमच्या खिशात असावा अथवा बाजूला ठेवलेला असावा. या पद्धतीने तुम्ही फोनवर बोललात तर तो गुन्हा ठरणार नाही,” असं गडकरी म्हणाले.

 

दरम्यान, ”या परिस्थितीमध्ये वाहतूक पोलीस (Traffic Police) तुमच्याकडून दंड आकारू शकत नाहीत.
पण. पोलिसांनी अशी कारवाई केल्यास तुम्ही त्यांच्या विरोधात न्यायालयात जाऊ शकता. गाडी चालवताना फोनवर बोलत आहात, म्हणून अटक झाली तरीही तुम्ही न्यायालयात अपील करू शकता. यामुळे वाहनचालकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. हा निर्णय रस्ते अपघात कमी करण्याच्या सरकारच्या ध्येयाशी सुसंगत असल्याचे गडकरी म्हणाले.

 

Web Title :- Nitin Gadkari | Nitin Gadkari says It will be legal to talk on the phone while driving but

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा