Nitin Gadkari On Modi Govt | नितीन गडकरींचा मोदी सरकारला घरचा आहेर; म्हणाले – ‘सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, हीच मोठी समस्या’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nitin Gadkari On Modi Govt | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे स्पष्ट वक्ते आणि विकासाला प्राधान्य देणारे नेते म्हणून ओळखले जातात. परंतु, यावेळी गडकरी यांनी स्पष्ट वक्तव्य करत थेट मोदी सरकारलाच (Modi Government) घरचा आहेर दिले आहे. वेळ ही अत्यंत महत्त्वाची असून विकासकामांबाबत सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, हीच मोठी समस्या आहे, असे परखड मत गडकरी यांनी मांडले आहे. ते नॅशनल कंव्हेशन ऑफ सिव्हिल इंजिनीअर्स (NATCON 2022) कार्यक्रमात बोलत होते. (Nitin Gadkari On Modi Govt)

 

मुंबईत आयोजित या कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले, बांधकाम क्षेत्रात वेळेला खूप महत्त्व आहे. वेळ हीच आपली खरी संपत्ती आहे. मात्र, सरकारची सर्वात मोठी समस्या ही आहे, की सरकार वेळेवर निर्णय घेत नाही. भारतात बांधकाम क्षेत्राचे भविष्य उज्वल आहे.

 

गडकरी पुढे म्हणाले, भारतात बांधकाम क्षेत्राचे भविष्य उत्वल असले तरी त्यासाठी आपल्याला जगातील नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल. आपल्याकडे बांधकामासाठी वापरण्यात येणार्‍या मेटरीयलला सुद्धा पर्याय शोधावे लागतील. जेणेकरून प्रकल्पाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता, त्याची किंमत कमी करत येईल. कोणत्याही प्रकल्पासाठी त्याची गुणवत्ता, किंमत आणि लागणारा वेळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो. (Nitin Gadkari On Modi Govt)

नितीन गडकरी यांनी थेट मोदी सरकारलाच घरचा आहेर दिल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपमधील मोठ्या संघटनात्मक बदलांमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीतून वगळण्यात आले आहे. निवडणूक समिती ही महत्त्वाची समिती असून लोकसभा आणि राज्यसभेसाठी ती उमेदवारांची निवड करते.

 

संसदीय बोर्डाचे सर्व 11 सदस्य हे निवडणूक समितीचे सदस्य आहेत. जे. पी. नड्डा (J. P. Nadda),
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh)
आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचा यात समावेश आहे.
याशिवाय अन्य सात जणात कर्नाटकातून बी. एस. येडियुरप्पा, आसाममधून सर्बानंद सोनोवाल,
तेलंगणातून के. लक्ष्मण, पंजाबचे इक्बाल सिंग लालपुरा आणि हरयाणातील सुधा यादव यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, येडियुरप्पा आणि जतिया यांचा समावेश करून 75 वर्षांच्या नियमालाही बाजूला ठेवले आहे.

 

Web Title :- Nitin Gadkari On Modi Govt | BJP leader and union minister nitin gadkari poke modi government for takeing decision on time

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dawood Ibrahim Brother Iqbal Kaskar | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ईब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर रुग्णालयात

 

Acidity Problems | अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेमुळे त्रस्त आहात का? करा ‘हे’ 5 घरगुती उपाय, ताबडतोब होईल परिणाम

 

Nilesh Rane | रिफायनरी प्रकल्पावरून निलेश राणेंचा ताफा; राणे म्हणाले – ‘मी हात जोडून माफी मागतो…’